मुंबई – कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्या असतील तसंच दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस झाले असतील अशा प्रवाशांना 15 ऑगस्टपासून उपनगरी रेल्वेमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल केली. सात दिवसांवर येऊन ठेपलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतांना नागरिकांनी संयम बाळगावा, गर्दी करू नये, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून कोरोनाला हरवण्याची जिद्द मनात कायम ठेवावी असं आवाहनही त्यांनी केलं.
स्मार्टफोन आहेत असे प्रवासी रेल्वेचा पास ॲपवरून डाऊनलोड करू शकतील आणि ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही असे प्रवासी शहरातील पालिकेच्या प्रभाग कार्यालयातून तसंच उपनगरी रेल्वे स्थानकांमधून छायाचित्रयुक्त पासेस घेऊ शकतील. या लोकल प्रवासाच्या पासवर क्यू आर कोड असतील असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
यानंतर, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते तथा आमदार राजू पाटील यांनी ठाकरे सरकारला थेट सवाल केले आहेत. पाटील म्हणाले रेल्वे प्रवासासाठी दोन डोस झालेल्यांना सशर्त का होईना परवानगी दिलीत बरंच आहे. प्रश्न हा आहे की दिव्यापासून थेट बदलापूरपर्यंत रोजच्या रोज कामानिमित्त प्रवास करणाऱ्या १५ ते २० लाख प्रवाशांचं लसीकरण कधी होणार? कासवगतीने सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेने ह्या सगळ्यांचं लसीकरण व्हायला किमान एक वर्ष तरी लागेल. त्यांनी रोजीरोटीसाठी प्रवास कधी करायचा? की त्यांना कायमच गृहीत धरणार आहात? रेल्वेप्रवास हा दळणवळणाचा एकमेव पर्याय असलेल्यांनी जगण्यासाठी कुठला पर्याय निवडायचा? लसीकरणाचा वेग वाढवा. जगणं सुकर होऊ द्यात. ही जबाबदारी नव्हे आपलं कर्तव्य आहे. पर्याय द्या, असे त्यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सगळं केंद्राने द्याव मी फक्त घरात बसणार, नाहीतर मर्सिडीज चालवणार’; भाजपची टीका
- 102 व्या घटना दुरुस्तीत बदल करणारे विधेयक सरकार आज लोकसभेत मांडणार
- पुण्यातील निर्बंध शिथिल केल्यानंतर आता सोलापुरातील निर्बंध शिथिल करण्याची होतेय मागणी
- मराठा आरक्षण : पुण्यात आज राज्यस्तरीय बैठक; संभाजीराजेंच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
- वाढदिवसाच्या मिरवणुकीत तलवार नाचवली,अबू आझमींसह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

