मुंबई : शिवसेनेसोबतची आमची युती ही ऐतिहासिक चूक होती. आम्ही राष्ट्रवादीसोबत जाणे योग्य होते, असे वक्तव्य माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. त्याला आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘भरकटलेल्या मनाची माणसं गांजा पिल्यासारखं बोलतात. राजाकरणामध्ये विरोधी पक्ष भरकटलेला आहे. अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.
संजय राऊत मुंबई येथील एका कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, मुनगंटीवार यांना मी अत्यंत संयमी आणि अभ्यासू नेते समजत होतो. त्यांची भाषणं मी ऐकत आलो आहे. पण कोणी कोणासोबत जावं हा त्यांचा प्रश्न नाही. महाराष्ट्रात तीन पक्षांनी ते ठरवलेलं आहे.
भाजपच्या नेत्यांनी केदारनाथला एक महिना जाऊन बसणं गरजेचं आहे. डोकी थंड झाली की नंतर महाराष्ट्रात येऊन त्यांनी राजकारण करावं. सध्या त्यांची मनस्थिती चांगली नाही. त्यांच मनस्वास्थ ठीक व्हावं यासाठी मी नव्या वर्षानिमित्त प्रार्थना करतो, असेही राऊत म्हणाले.
कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. या घटनेविरोधात बेळगावात मराठी तरुणांनी आंदोलन केले. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी ३८ तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. यावर संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरील हल्ल्याचा निषेध केल्यावर भाजप शासित राज्यांमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. असेही संजय राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत ‘मविआ’ला मोठा धक्का; भाजपला ९ तर मविआला ५ जागा
- तुम्ही मास्क का नाही वापरत, यावर संजय राऊत म्हणतात, “मी मोदींना फॉलो करतो”
- ‘बेळगावच्या तरुणांनी महाराष्ट्रासाठी लढा द्यायचा व सरकारने…’, शिवसेनेचे टीकास्त्र
- “छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरील हल्ल्याचा निषेध करणे देशद्रोह कसा?”, संजय राऊतांचा सवाल
- ऐतिहासिक कामगिरी; 113 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेत घेतली आघाडी


