Share

“…म्हणजे राज ठाकरे पूर्वी खोटं बोलायचे का?”, राष्ट्रवादीचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: २०१९ लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सोबत होते तेव्हा गुदगुल्या होत होत्या, आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले तर त्यांना खाजवायला होतंय अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भिवंडीत केली होती. यावरच आता राष्ट्रवादीचे नेते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना खोचक सवाल केला आहे.

“देवेंद्र फडणवीस जी सांगतात ‘राज ठाकरे तेव्हा बोलायचे तर गुदगुल्या व्हायच्या, आता सत्य बोलतात तर खाजवायला होतंय’, म्हणजे राज ठाकरे जी पूर्वी ‘खोटं’ बोलत होते असं फडणवीसजी यांचे म्हणणे आहे का?”, असा टोला क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत लगावला आहे. 

नेमके काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज ठाकरे भाजपच्या हातचे बाहुले आहेत, अशी टीका केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की,” राज ठाकरे सत्य बोलत असल्याने त्यांचे घाव महाविकास आघाडी सरकारच्या वर्मी लागतात. भाजप सक्षम आहे .आम्ही पोलखोल यात्रा सुरू केली आहे . त्यामुळे  सरकार मधील पक्ष चिंतीत आहेत. २०१९ लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सोबत होते तेव्हा यांना गुदगुल्या होत होत्या, आता राज ठाकरे सत्य बोलायला लागले तर त्यांना खाजवायला होतंय.”

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!