🕒 1 min read
मुंबई: सद्यस्थितीत १४ हजार मेगावॉटची तूट असल्याने राज्यात विजेचे भारनियमन सुरू झाले आहे. अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (nitin raut) यांनी गुरुवारी (२१ एप्रिल) दिली. या संदर्भात काल महत्त्वाची बैठक झाली होती. यावरूनच भाजप नेते अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी ट्वीट करत टीका केली आहे.
‘होय, राज्यात विजेचे भारनियमन सुरू झाले आहे’, अशी थेट कबुली ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी दिली. भारनियमनाची कबुली म्हणजे ऊर्जामंत्र्यांनी आपल्या बेजबाबदारपणाची दिलेली कबुली आहे. आता सवयी प्रमाणे याचे खापर केंद्राच्या मोदी सरकारवर फोडतील. महा बेजबाबदार आघाडी सरकार. असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.
'होय, राज्यात विजेचे भारनियमन सुरू झाले आहे', अशी थेट कबुली ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी दिली.
भारनियमनाची कबुली म्हणजे ऊर्जामंत्र्यांनी आपल्या बेजबाबदारपणाची दिलेली कबुली आहे. आता सवयी प्रमाणे याचे खापर केंद्राच्या मोदी सरकारवर फोडतील.
महा बेजबाबदार आघाडी सरकार. pic.twitter.com/6Q4heTTsTz— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 22, 2022
दरम्यान महावितरण कंपनीला अदानी पॉवरच्या तिरोडा प्रकल्पातून २१०० मेगावॉट वीज मिळणे अपेक्षित असताना १७६५ मेगावॉट वीज उपलब्ध होत आहे. तसेच केंद्रीय प्रकल्पांमधून ७६० ऐवजी ६३० मेगावॉटच वीज दिली जात आहे. त्यामुळे भारनियमन होत आहे. सोबतच महानिर्मितीला केंद्र सरकारकडून कोळसादेखील मिळत नसल्याचे नितीन राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- पर्यावरण व हवामानाचा योग्य समतोल राखून वसुंधरेला संरक्षित करण्याचा निर्धार करा- शरद पवार
- “दुर्दैवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही म्हणूनच…”, संजय राऊतांचा फडणवीसांना टोला
- IPL 2022 MI vs CSK : महेंद्रसिंह धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल..! मुंबईचा सलग सातवा पराभव
- IPL 2022 MI vs CSK : चेन्नईचा चौधरी चमकला..! मुंबईचं चेन्नईला १५६ धावांचं आव्हान
- IPL 2022 MI vs CSK : महासामन्याला सुरुवात..! चेन्नईनं जिंकला टॉस; मुंबईकडून दोघांचं पदार्पण!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
