गोपीचंद पडळकरांनी घेतली रोहित पवारांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

अहमदनगर: विधिमंडळाच्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती’ने आज (२२ एप्रिल) राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (rohit pawar) यांच्या  मतदारसंघास भेट दिली. यावेळी समितीचे अध्यक्ष आमदार शांताराम मोरे आणि सदस्य आमदार संजय दौंड, डॉ. रत्नाकर गुट्टे, गोपीचंद पडळकर आणि बळवंत वानखेडे या सर्वांचे जामखेडमध्ये रोहित पवारांनी स्वागत केले.

या समितीअंतर्गत येणाऱ्या विविध विषयांवर अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर समितीने काही ठराविक कामांनाही भेट दिली. यावेळी जामखेडमध्ये डीपीसी अंतर्गत मंजूर झालेल्या शाळा खोल्यांच्या कामाचं समिती सदस्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. याबाबत रोहित पवार यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

त्यानंतर वेळ मिळाल्याने ऐतिहासिक खर्ड्याच्या किल्ल्याला समितीने भेट दिली आणि येथे उभारलेल्या देशातील सर्वांत उंच भगव्या स्वराज्य ध्वजाची पाहणी केली. तसेच संत श्री. सिताराम बाबा आणि संत श्री. गीतेबाबा या दोन्ही गडावरील समाधीचे  दर्शन घेऊन येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी समितीने केली.

महत्वाच्या बातम्या: