पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी १७ एप्रिलला मतदान होणार असून २ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून ३० मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर ३ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. काही वेळापूर्वीच भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली होती.
यानंतर आता राष्ट्रवादीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. आता ही उत्सुकता संपलेली आहे. राष्ट्रवादीकडून दिवंगत भारत नाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे.
यावर आता विविध नेत्यांची प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालेली आहे. ‘पंढरपूर-मंगळवेढा चे लोकप्रिय आमदार भारतनाना भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. भारत नानांवर प्रेम करणारी पंढरपूर-मंगळवेढा ची जनता भगीरथ यांनाही विजयी करणार हा विश्वास आहे.’अशा आशयाचे ट्वीट बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी करून भगीरथ भालके यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंढरपूर-मंगळवेढा चे लोकप्रिय आमदार भारतनाना भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी @NCPspeaks चे अधिकृत उमेदवार भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे.भारतनानांवर प्रेम करणारी पंढरपूर-मंगळवेढा ची जनता भगीरथ यांनाही विजयी करणार हा विश्वास आहे. https://t.co/645jGm057z
— Supriya Sule (@supriya_sule) March 29, 2021
परंतु त्यासोबतच महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुखाने बंडखोरी केली आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बैलगाडीत बसून येत मोठे शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. यामुळे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होईल असे चित्र सध्या तरी निर्माण झाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘लॉकडाऊन करू नका वर्षभर लोक कसे जगले, ते तुम्हाला मातोश्रीत बसून कळणार नाही’
- पवारांनी लवकरात लवकर पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावे – चंद्रकांत पाटील
- दारुचा मोठा साठा सेलू पोलिसांनी पकडला, गुन्हा दाखल
- ‘अनुसूचित जातीची आहेस’ असे हिणवत विवाहितेचा अमानुष छळ
- ‘हॉटस्पॉट’ वसाहतींमध्ये निर्जंतुकीकरणाची जबाबदारी कोणाची?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

