परभणी : सेलू पोलिसांनी रविवारी (दि. 29) रात्री दोन वेगवेगळ्या ठिकाणावर केलेल्या कारवाईत 57 हजार रुपयांच्या देशी दारूसह एक कार सेलु येथुन जप्त करण्यात आली आहे. सेलू पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
सेलू पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोवर्धन भूमे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, कर्मचारी मुजीब, रामेश्वर मुंडे, गवळी, मोरे यांच्यासह पेट्रोलिंग करत असताना देऊळगाव गात येथे मोठ्या प्रमाणात दारूचा अवैध साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून त्यांनी देऊळगाव गात येथे जाऊन मिळालेल्या माहितीच्या आधारावर छापा टाकला. त्यावेळी तेथे 10 बॉक्स दारुचे आढळले. पोलिसांनीे 27 हजार 456 रुपयांची दारू जप्त केली. यावेळी बालकिशन साळवे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच रविवारी रात्री दहाच्या सुमारास सातोना येथून देऊळगाव गात येथे एका कारमधून अवैध व चोरटया पद्धतीने विकन्यासाठी दारू आणल्या जात असल्याची माहिती सेलू पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी देऊळगाव गात ते डासाळा रोडवर फौजदार संतोष माळगे पेट्रोलिंग करत असताना राधे धामनगाव पाटीवर एक पांढऱ्या रंगाची कार (क्रमांक एमएच 44 जी 0847) चा पाठलाग करून थांबवली. यावेळी अंधाराचा फायदा घेऊन कार मधील एक जण फरार झाला. कारची तपासणी केली असता त्यात दारूचे बारा बॉक्स पोलिसांना या वेळी सापडले. पोलिसांनी 29 हजार 952 रुपयांची दारू व कार असा एकूण १ लाख 79 हजार 952 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास गजानन गवळी हे करीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- पंढरपूर पोटनिवडणूक : भाजपचं ठरल ! ‘हा’ नेता उद्या भरणार उमेदवारी अर्ज
- ऑपरेशन लोटस सुरु ? चंद्रकांतदादा म्हणाले, पहाटेच्या शपथविधी सारखं समजेलच !
- ‘चित्रा वाघ, नवनीत राणा, तृप्ती देसाईंना दिपाली चव्हाण प्रकरणात पॉलिटिकल मायलेज दिसत नाही’
- ‘…आता तरी रहस्य कथेचा शेवट करा’; शाह-पवारांच्या भेटीवर संजय राऊतांच भाष्य
- मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते समाधान अवताडे कोण आहेत ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

