पुणे : राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या.
यासंदर्भात आयोजित महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली असून राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची तयारी करण्यात येत आहे.
मात्र आता भाजपकडून लॉकडाऊनचा कडाडून विरोध करण्यात येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत आपली भूमिका जाहीर करत आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करु अस म्हंटल आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रमाणावर लॉकडाऊन हे उत्तर नाही. कोरोना संसर्गजन्य आहे. पण त्याचे नियम पाळूनही तुम्ही घरी बसायला सांगत असाल तर ते शक्य नाही. आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करु, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
कोरोनाच्या वाढत्या प्रमाणात ल़ॉकडाऊन हे उत्तर नाही. आता जर लॉकडाऊन केलं तर तुम्ही एक रुपयाचं पॅकेज देणार नाही. वर्षभर लोक कसे जगले, ते तुम्हाला मातोश्रीत बसून कळणार नाही. त्यासाठी ठिकठिकाणी फिरावे लागेल, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये जा. त्या ठिकाणी प्रत्येक जण काही ना काही तरी करुनच पोट भरतो. त्यांना तुम्ही काहीही दिलं नाही. काळजी घेऊन लोकांनी नित्याचे व्यवहार केले पाहिजेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- भर उन्हात ममतादीदींचा प्रचार जोमात, भाजप कोमात
- पवारांनी लवकरात लवकर पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावे – चंद्रकांत पाटील
- दारुचा मोठा साठा सेलू पोलिसांनी पकडला, गुन्हा दाखल
- ‘अनुसूचित जातीची आहेस’ असे हिणवत विवाहितेचा अमानुष छळ
- ‘हॉटस्पॉट’ वसाहतींमध्ये निर्जंतुकीकरणाची जबाबदारी कोणाची?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

