लातूर: तू अनुसूचित जातीची आहेस, तुला सून म्हणून स्वीकारणार नाही, असे म्हणत तीन वर्ष विवाहितेचा अमानुष छळ केल्याची घटना लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील तळेगाव भोगेश्वर येथे घडली आहे. तीन वर्षापासून विवाहिता हा छळ सहन करत होती, अखेर देवणी पोलिसांत तिने धाव घेतली आणि पोलिसांनी तिच्या पतीसह सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अनुसूचित जाती जमातीच्या धम्मपाली या तरुणीचा तळेगाव भोगेश्वर येथील रामदास निडवंचे या तरुणासोबत आंतरजातीय विवाह झाला. लग्नानंतर तिला खालच्या जातीची असल्याने तिचा अमानुष छळ सासरच्यांनी सुरु केला. तू खालच्या जातीची आहेस, त्यामुळे तुला सून म्हणून आम्ही घरात घेऊ शकत नाही, असे म्हणत तिच्यावर शारीरिक अत्याचार देखील करण्यात आले, तसेच तिचा मानसिक छळ देखील करण्यात येत होता.
धक्कादायक बाब म्हणजे यात तिचा पती सुद्धा शामिल होता. आपलं घर सोडून सासरी पतीच्या भरोस्यावर मुलगी जात असते, पण नंतर तिचाच पती तिचा छळ करतो यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही. घरात राहायचे असेल तर माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये नाहीतर घरात राहू नको, अशी धमकी तिला सासरच्यांकडून वारंवार मिळत होती. अखेर हा अमानुष छळ असह्य झाल्याने तिने पोलिसांकडे धाव घेतली.
धम्मपालीच्या फिर्यादीवरून देवणी पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार पती रामदास निडवंचे तसेच तिच्या सासरकडच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास निलंगा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे हे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘हॉटस्पॉट’ वसाहतींमध्ये निर्जंतुकीकरणाची जबाबदारी कोणाची?
- भारत नानांच्या मुलाला आमदार करणारच! भगीरथ भालकेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर
- ‘बांगलादेश लढ्यात मोदींना नेमकी कधी अटक झाली होती? ती माहिती दिल्यास…’
- कोरोना रुग्णांसाठी शहरातील मंगल कार्यालय ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू
- ‘सचिन वाझेंमुळे अडचणी निर्माण होतील असे त्यांना सेवेत घेतानाच सांगितले होते’


