औरंगाबाद : शहरात दररोज दिड हजारांवर रुग्ण निघत आहेत. मात्र त्या तुलनेत आरोग्य सुविधा पुरवणारी यंत्रणाच कोलमडल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण शहरभर बोंबलत फिरतांना दिसत आहेत. सध्या सौम्य लक्षणे असणारे ३७८५ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. मात्र खरोखर हे रुग्ण चार भिंतीच्या आत आहेत का? या वसाहतींचे निर्जंतुकीकरण होत आहे का? याबाबत प्रशासनाची उदासीन भूमिका पाहायला मिळत आहे.
महापालिकेने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवतांना गतवर्षी शहरातील अनेक वसाहती निर्जंतूक केल्या होत्या. यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्यांचा वापर केला होता. मात्र यावेळी कोरोना संसर्ग शहरात अक्षरशः उद्रेक झालेला असतानाही अद्याप वसाहती निर्जंतूक करण्याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. हेही एक प्रमुख कारण संसर्ग वाढीस कारणीभूत भरत आहे.
पालिका प्रशासनाने गतवर्षी मार्च महिन्यात कोरोना संसर्ग सुरू होताच बाधित वसाहतींमध्ये निर्जंतुकीकरणाची जम्बो मोहीम राबवली होती. यासाठी त्यावेळी अग्निशमन विभागाच्या गाड्यांचा वापर करण्यात आला होता. त्यावेळी केद्रांच्या स्मार्ट सिटी मिशनने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्जंतुकीकरणासाठी विशेष पंप व वाहने स्मार्ट सिटीच्या यादीत असलेल्या शहरांना उपलब्ध करून दिली होती. मात्र औरंगाबाद शहरात ही सुविधा आलीच नाही. मात्र स्मार्ट सिटी व्यवस्थापनाने औरंगाबाद शहरात कोरोना प्रतिबंधासाठी विशेष उपाययोजना राबवल्याचा अहवाल पाठवत स्वतःचीच पाठ थोपटून घेतली होती.
आता यंदा तर शहरात मोठ्या प्रमाणात कोरोना संर्स वाढत असताना पालिकेला निर्जंतुकीकरणाचा विसरच पडलेला आहे. वसाहती मोठ्या प्रमाणावर बाधित होत असताना अद्याप वसाहती निर्जंतूक करण्यात आलेल्या नाहीत. मात्र आता पालिकेने शहरातील छोट्या वस्त्या निर्जंतूक करण्यासाठी फायर टेंडर मिळावेत, यासाठी राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाला प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘बांगलादेश लढ्यात मोदींना नेमकी कधी अटक झाली होती? ती माहिती दिल्यास…’
- कोरोना रुग्णांसाठी शहरातील मंगल कार्यालय ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू
- ‘सचिन वाझेंमुळे अडचणी निर्माण होतील असे त्यांना सेवेत घेतानाच सांगितले होते’
- मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपने ज्यांना उमेदवारी दिली ते समाधान अवताडे कोण आहेत ?
- राजस्थान रॉयल्समध्ये जोफ्रा आर्चरच्या जागी ‘हे’ नवीन पर्याय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

