Share

पवारांनी लवकरात लवकर पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावे – चंद्रकांत पाटील

Published On: 

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे.शरद पवार यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.

शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच विविध नेत्यांनी त्यांची विचारपूस केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील पवारांच्या स्वास्थ्यासाठी सदिच्छा देत त्यांनी लवकरात लवकर पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावे असं भाष्य केलं आहे.

‘शरद पवार साहेबांची प्रकृती अचानक बिघडल्याचे वृत्त कळले. ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, त्यांनी लवकरात लवकर रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन पुन्हा महाराष्ट्राचे मार्गदर्शन करण्यासाठी रुजू व्हावे,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पवारांना फोन !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शरद पवार यांची फोनद्वारे विचारपूस केली आहे. याबाबत शरद पवार यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरून माहिती देण्यात आली आहे. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्या प्रकृतीसंदर्भात अत्यंत आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या सदिच्छा या महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक भावना आहेत. मनपूर्वक आभार!’ असं ट्विट करण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!