Share

‘बेस्ट ऑफ थ्री’वर गांगुलीची प्रतिक्रिया, म्हणाला…

Published On: 

इंग्लंड : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) विजेतेपद मिळवण्याचे विराट ब्रिगेडचे स्वप्न भंगले आहे. न्यूझीलंडने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. सह न्यूझीलंडच्या संघाने विजेतेपद मिळविले आणि विराट ब्रिगेड आयसीसी करंडक जिंकण्यात चुकला.

परंतु, डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी ही ‘बेस्ट ऑफ थ्री’ असली पाहिजे. या स्पर्धेचा विजेता किमान तीन सामन्यांच्या निकालाने ठरला पाहिजे, असे विधान काही दिवसांपूर्वी भारताचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केले होते. भारताचा कर्णधार विराट कोहलीही प्रशिक्षकांच्या मताशी सहमत आहे. जगातील सर्वोत्तम कसोटी संघ ठरवण्यासाठी किमान तीन सामने होणे गरजेचे आहे, केवळ दोन दिवसांच्या खेळावर सर्वोत्तम कसोटी संघ ठरू शकत नाही, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यानंतर कोहलीने  असे मत व्यक्त केले होते.

आता या मुद्द्यावर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही त्याचं मत मांडलं आहे. द वीकसोबत बोलताना गांगूली म्हणाला, ‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळवण्याची आयसीसीची ही कल्पना उत्कृष्ट आहे. टेस्ट क्रिकेट सगळ्यात मोठा आणि मजबूत फॉरमॅट आहे आणि याची फायनल झाली पाहिजे. एक फायनल झाली पाहिजे का तीन, याबाबत बोलणं लवकरचं ठरेल. आता कुठे सुरुवात झाली आहे, हा पहिलाच सिझन होता. आयसीसी सगळ्यांकडू प्रतिक्रिया घेईल आणि भविष्यात याबाबत विचार करेल,’ असं गांगुली म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!