उस्मानाबाद : पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकार्पण सोहळ्यावरून सांगलीत सध्या राजकारण रंगताना दिसून येत आहे.भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी स्मारकावर ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी करत उद्घाटन केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, गोपींचद पडळकर यांच्याकडून करण्यात आलेल्या स्मारकाच्या लोकार्पणावरुन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर (Sakshna Salgar) आक्रमक झाल्या असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावर गोपीचंद पडळकरांचे काम सुरु असल्याचा गंभीर आरोप सलगर यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलत असतांना सलगर म्हणाल्या की,‘भाजपने गोपीचंद पडळकरांची नियुक्ती वायफळ बडबड करण्यासाठी आणि हायव्होल्टेज ड्रामा करण्यासाठी केली असून त्यांचा हा ड्रामा मी आज टीव्हीवर बघितला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या अखंड भारताचे दैवत आहेत. त्यांच्या स्मारकाचा लोकार्पण करण्याचा कार्यक्रम शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार होता. तसेच राज्यातील मेंढपाळ बांधवांच्या उपस्थित तो कार्यक्रम होणार होता. परंतु, गोपीचंद पडळकर यांना ते पाहावत नव्हतं. महाराष्ट्रातील सलोखा बिघडवण्याचे काम पडळकरांनी केले आहे’, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,‘गोपीचंद पडळकरांचा जो अनांगोदी कारभार चाललाय तो देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच चाललाय. देवेंद्र फडणवीस जेवढी स्क्रिप्ट देतात तेवढा कार्यक्रम करणे असे पडळकरांचे सुरु आहे.’ तसेच तुम्हाला भाजपचा अंजेडा चालवण्यासाठी आमदार केले आहे का?, असा सवालही सलगर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…आधीच विरोधी पक्षनेत्यांचे ‘पंटर्स’ या कार्यक्रमात गोंधळ घालतात”, अहिल्यादेवी होळकर स्मारक वादावरून राऊतांची टीका
- “..करणाऱ्याला पेशवे शेणात पडलेल्या शेंगदाण्यासारखे काढून फेकतील”, अमोल मिटकरींनी ‘मंगळसूत्र चोर’ म्हणत कुणावर साधला निशाणा?
- “…तरी त्यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही”,संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना जोरदार टोला
- “…तेव्हा महाराष्ट्र चुलीत गेलेला चालतो काय?”, राऊतांचा फडणवीसांना सवाल
- भाजपच्या असंख्य भ्रष्टाचारांबाबत हाच हातोडा शांत का?- संजय राऊत


