मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणावरुन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला असून परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या कोकणात गेले आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून टीका केली आहे. तसेच अशा मनोविकृतांच्या डोक्यावर कितीही हातोडे मारले तरी त्यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही, असा खोचक टोलाही राऊतांनी लगावला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘ज्यांच्या स्वतःवरच भ्रष्टाचाराचे, जमीन घोटाळ्यांचे आरोप आहेत असे भाजपचे युगपुरुष किरीट सोमय्या हे हाती कागदी हातोडा घेऊन, मुंबईतून भाडोत्री लोक घेऊन कोकणातील शांतता भंग करायला पोहोचले. काय तर म्हणे, दापोलीतील अनधिकृत रिसॉर्ट तोडणार आहोत. बरं, भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला हे महाशय निघाले तर त्यांच्यासोबत आणि स्वागताला कोण? तर ‘ईडी’कडे ज्यांच्या ‘मनी लॉण्डरिंग’चे, १०० बोगस कंपन्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे दिले व ज्यांना तुरुंगात टाका अशी मागणी केली त्याच नारायण राणे यांच्या मुलास बाजूला बसवून हे महाशय कोकणातील भ्रष्टाचार संपवायला निघाले. हा एक मानसिक घोटाळाच आहे व अशा मनोविकृतांच्या डोक्यावर कितीही हातोडे मारले तरी त्यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘भ्रष्टाचारांच्या तसेच घोटाळेबाजांच्या हातात हात घालून ‘युगपुरुष’ सोमय्या अनधिकृत की काय ते रिसॉर्ट तोडायला निघाले यावर देवेंद्र फडणवीस काय बोलणार आहेत? काहीही बोला, पण खरे बोला. देवेंद्र फडणवीस हे काल शिर्डीत साईचरणी गेले व म्हणाले, ‘राजकारण गेले चुलीत, मात्र इथले गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे, पण त्याला बट्टा लागलाय. ही अवस्था महाराष्ट्रात कधीही पाहिली नव्हती.” राजकारण जाईल चुलीत, महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे असे शहाणपणाचे उद्गार फडणवीस यांनी साईचरणी काढले, पण महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम ते स्वतःच करीत आहेत व चुलीची शेकोटी घेत बसले आहेत. विरोधी पक्षनेत्यांचे हे गुड गव्हर्नन्स नक्कीच नाही. विरोधी पक्षातले फुटकळ लोक प्रशासनातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून गव्हर्नन्सची प्रतिमा मलिन करतात तेव्हा महाराष्ट्र चुलीत गेलेला चालतो काय?’, असा सवालही त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा का?”, संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल
- “..करणाऱ्याला पेशवे शेणात पडलेल्या शेंगदाण्यासारखे काढून फेकतील”, अमोल मिटकरींनी ‘मंगळसूत्र चोर’ म्हणत कुणावर साधला निशाणा?
- IPL 2022 MI vs DC : दिल्लीचा विजयारंभ; ललित-अक्षरनं हिरावला मुंबईचा विजयी घास!
- IPL 2022: डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात पंजाबचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय ; असे आहेत दोन्ही संघ
- “आम्ही त्यांच्या नाकावर टिच्चूनच काम करणार”- गोपीचंद पडळकर


