Share

“…हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा का?”, संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल

Published On: 

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे काल शिर्डीत साईचरणी गेले व म्हणाले, ‘राजकारण गेले चुलीत, मात्र इथले गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे, पण त्याला बट्टा लागलाय. ही अवस्था महाराष्ट्रात कधीही पाहिली नव्हती.’ राजकारण जाईल चुलीत, महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे असे शहाणपणाचे उद्गार फडणवीस यांनी साईचरणी काढले, पण महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम ते स्वतःच करीत आहेत,असेही राऊत म्हणाले.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे देवाच्या चरणी जाऊन बोलता हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा काय? देवाच्या चरणी तरी खरे बोला! मुळात देशातील भाजपशासित राज्यांत गुड गव्हर्नन्सचा जो खेळखंडोबा चालला आहे त्याकडे एकदा डोळे उघडून पहा, म्हणजे महाराष्ट्रातील स्थितीविषयी सत्य समजायला मदत होईल.’

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘भाजपने काय करावे किंवा करू नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न, पण त्या मंडळींनी निदान महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेशी तरी खेळू नये. विरोधकांकडून रोजच नवनवीन पद्धतीने आरोप करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू असल्याची खंत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची तीच खंत आहे. विरोधी पक्षाच्या बेबंद वृत्तीमुळे राज्य बदनाम व्हावे व त्या बदनामीचा आनंदोत्सव साजरा करावा हे चांगले नाही. वळसे-पाटलांचे म्हणणे असे की, ‘पेन ड्राईव्ह’ ही आता नवीन पद्धत निघाली आहे. खोटे आरोप करायचे, केंद्रीय यंत्रणेची भीती दाखवायची, भ्रष्टाचाराचे आरोप करीत संबंध नाही त्यांच्याशी संबंध जोडायचे, एकीकडे कायदा-सुव्यवस्था अडचणीत आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे छोट्या छोट्या गोष्टीवरून ‘मोर्चे’ काढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा असे उपद्व्याप राज्यातील विरोधी पक्ष करीत असल्याचे वळसे-पाटलांचे म्हणणे आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!