मुंबई: ‘काहीही बोला, पण खरे बोला’ देवेंद्र फडणवीस हे काल शिर्डीत साईचरणी गेले व म्हणाले, ‘‘राजकारण गेले चुलीत, मात्र इथले गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे, पण त्याला बट्टा लागलाय. ही अवस्था महाराष्ट्रात कधीही पाहिली नव्हती.’’ राजकारण जाईल चुलीत, महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे असे शहाणपणाचे उद्गार फडणवीस यांनी साईचरणी काढले, पण महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम ते स्वतःच करीत असल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून त्यांना संतप्त सवाल केला आहे.
विरोधी पक्षनेत्यांचे हे गुड गव्हर्नन्स नक्कीच नाही. विरोधी पक्षातले फुटकळ लोक प्रशासनातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून गव्हर्नन्सची प्रतिमा मलिन करतात तेव्हा महाराष्ट्र चुलीत गेलेला चालतो काय? असा सवाल संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून केला आहे. मुळात देशातील भाजपाशासित राज्यांत गुड गव्हर्नन्सचा जो खेळखंडोबा चालला आहे त्याकडे एकदा डोळे उघडून पहा, म्हणजे महाराष्ट्रातील स्थितीविषयी सत्य समजायला मदत होईल. उत्तर प्रदेशात नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल पन्नासेक मंत्र्यांचा शपथविधी करून घेतला. त्यातील २२ मंत्र्यांवर भयंकर गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणे नोंदवली आहेत व त्या मंत्र्यांना किमान पाच ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. गोव्यातही वेगळी स्थिती नाहीच. हे असले गुड गव्हर्नन्स तुम्हाला चालत असेल तर तो तुमचा प्रश्न. असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे.
तसेच फडणवीस यांनी २०२४ ची तयारी चालवली आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा, पण तोपर्यंत महाराष्ट्राची प्रतिमा देशात पुरती मलिन करायची, महाराष्ट्राच्या प्रशासनाचा पायाच पोखरून टाकायचा. प्रशासनावर चिखलफेक करून, खोटे आरोप करून प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची करायचे, हे कसले धोरण? हे असले राजकारण महाराष्ट्रात कधीच घडले नव्हते. असा संतापही राऊत यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“…तरी त्यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही”,संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना जोरदार टोला
“…हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा का?”, संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल
IPL 2022: २०६ धावांचे डोंगर सर करत पंजाबची विजयी सलामी ; आरसीबीवर ५ विकेट्सने मात !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

