मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांच्या अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणावरुन भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला असून परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून सोमय्या कोकणात गेले आहेत. तसेच कोकणाकडे निघण्यापूर्वी सोमय्यांनी प्रतिकात्मक हातोडा दाखवत ठाकरे सरकारला इशारा दिला. हा हातोडा जनतेच्या भावनेचं प्रतिक असून जनता असाच हातोडा घेऊन यांना बाहेर घालवणार आहे. हा हातोडा साडेबारा कोटी जनतेचा आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, या मुद्द्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून टीका केली आहे. तसेच भाजपच्या असंख्य भ्रष्टाचारांबाबत हाच हातोडा शांत का?, असा सवालही त्यांनी केला आहे.
लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘उत्तर प्रदेशात नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल पन्नासेक मंत्र्यांचा शपथविधी करून घेतला. त्यातील २२ मंत्र्यांवर भयंकर गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणे नोंदवली आहेत व त्या मंत्र्यांना किमान पाच ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. गोव्यातही वेगळी स्थिती नाहीच. हे असले गुड गव्हर्नन्स तुम्हाला चालत असेल तर तो तुमचा प्रश्न. फडणवीस यांनी २०२४ ची तयारी चालवली आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा, पण तोपर्यंत महाराष्ट्राची प्रतिमा देशात पुरती मलिन करायची, महाराष्ट्राच्या प्रशासनाचा पायाच पोखरून टाकायचा. प्रशासनावर चिखलफेक करून, खोटे आरोप करून प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची करायचे, हे कसले धोरण? हे असले राजकारण महाराष्ट्रात कधीच घडले नव्हते.’
दरम्यान, दापोलीत परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट आहे की नाही, ते कायदेशीर की बेकायदेशीर ते ठरवायला न्यायालय व शासकीय यंत्रणा आहेत, पण हातात हातोडा व सोबत गावगुंडांची फौज घेऊन कोकणात घुसणाऱ्यांना फडणवीस कसे काय समर्थन देऊ शकतात? हिंमत होती तर धडक जायचे. प्रसिद्धीसाठी इतका गाजावाजा करीत, बोंबा मारत जायची गरज नव्हती. यांना फक्त सरकारची बदनामी करायची आहे व वातावरण खराब करायचे आहे. हेच ते सोमय्या ज्यांनी मुंबईतील शाळांत मराठी भाषा सक्तीची असण्याला विरोध केला होता. त्यांच्या हातातला हातोडा महाराष्ट्राला, मराठी माणसाला विरोध करण्यासाठीच आहे. भारतीय जनता पक्षाच्या असंख्य भ्रष्टाचारांबाबत हाच हातोडा शांत का? नारायण राण्यांपासून इतर अनेक नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्रात अनधिकृत इमले उभारून कायदे धाब्यावर बसवले आहेत. मारताय त्यावर तुमचे नौटंकी छाप हातोडे? त्यामुळे फडणवीसांची वक्तव्ये व अशा हातोड्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. २०२४ बरोबरच त्यांना २०२९ चीही तयारी करावी लागेल. समझनेवाले को इशारा काफी है’, लेखाच्या शेवटी असा इशाराही राऊतांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा का?”, संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल
- “..करणाऱ्याला पेशवे शेणात पडलेल्या शेंगदाण्यासारखे काढून फेकतील”, अमोल मिटकरींनी ‘मंगळसूत्र चोर’ म्हणत कुणावर साधला निशाणा?
- “…तरी त्यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही”,संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना जोरदार टोला
- IPL 2022: डबल हेडरच्या दुसऱ्या सामन्यात पंजाबचा टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय ; असे आहेत दोन्ही संघ
- “आम्ही त्यांच्या नाकावर टिच्चूनच काम करणार”- गोपीचंद पडळकर


