Share

बारावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालय प्रशासनासमोर पेच, आता प्रतिक्षा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात घोषणा करून दोन महिने पूर्ण होत आहेत. मात्र अजूनही मार्गदर्शक सूचना आलेल्या नसल्याने अकरावीचा निकाल कसा लावायचा असा प्रश्न महाविद्यालयासमोर उपस्थित झाला आहे. बारावी प्रवेशासाठी विद्यार्थी येत आहेत मात्र निकाल तयार नसल्याने मोठा गोंधळ वाढला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत यंदा पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्यात आली. त्यानंतर नववी अकरावी बाबत निर्णय घेण्यात आला. दहावी-बारावीच्या परीक्षा ही यंदा होणार नाहीत. पहिली ते आठवीच्या पातळीवर मूल्यांकन याबाबत मार्गदर्शन शाळांना करण्यात आले आहे. मात्र त्याची प्रक्रिया अनेक शाळास्तरावर अद्याप अपूर्ण आहे. तसाच प्रकार नववी अकरावी बाबतही समोर आला आहे. शाळा महाविद्यालयांकडे निकाल पत्रक तयार नसल्याने शाळेचा दाखला काढण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत.

अनेकांची इतर गावांमध्ये बदली झाली किंवा इतर ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी अनेक जण इच्छुक असतात. विद्यार्थी शाळा कॉलेजकडे चौकशी करत आहेत. मात्र मूल्यांकन कसे करायचे हे निश्‍चित नसल्याने गोंधळ वाढलेला आहे. नववी अकरावी बाबत सरकारने सात एप्रिलला वर्गोन्नतीची घोषणा केली होती. या विषयीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जाहीर केल्या जातील. असे सांगण्यात आले होते. नववी मूल्यांकनाची प्रक्रिया अनेक शाळांनी पूर्ण केली परंतु अकरावी बाबत अद्याप स्पष्टता नाही. तर दुसरीकडे शैक्षणिक वर्ष १६ जून पासून सुरू होत आहे. बारावीचे ऑनलाईन वर्ग सुरू करताना कॉलेज समोर काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!