Share

…त्यामुळे पेट्रोल-डीझेल दर कमी करण्याची ही योग्य वेळ नाही – पेट्रोलियम मंत्री

Published On: 

अहमदाबाद : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोलने शंभरी पार केली असली तरी कंपन्यांकडून दरवाढीचा सपाटा सुरुच आहे. आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेल दरात वाढ करण्यात आली आहे.आज पेट्रोल दरात २७ पैसे तर डिझेलमध्ये २३ पैसे वाढ करण्यात आली असून एक लिटर पेट्रोलचा भाव पहिल्यांदाच १०० रुपयांवर गेला होता.

पेट्रोलियम कंपन्या दररोज दर वाढवत आहेत. वाढत्या दराच्या परिणामामुळे जनता त्रस्त आहे. दरम्यान, डिझेल आणि पेट्रोलचे दर अद्याप कमी करता येणार नाहीत, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केले, ते गुजरात दौऱ्यावर होते.

पेट्रोल-डिझेलचे दर कमी होतील का? असा प्रश्न धर्मेंद्र प्रधान यांना केला असता. ते म्हणाले, “सरकारचे उत्पन्न बरेच कमी झाले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ दरम्यान उत्पन्न कमी राहिले आणि २०२१-२२ मध्येही कमी राहण्याची शक्यता आहे. सरकारचे उत्पन्न कमी आहे आणि खर्च जास्त आहे. त्यामुळे तेलाचे दर आता कमी करता येणार नाहीत”

आरोग्य क्षेत्रातील खर्च वाढला आहे. कल्याणकारी कामांमध्येही सरकार खर्च करीत आहे. वाढलेला खर्च आणि घटलेले उत्पन्न पाहता पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्याची ही योग्य वेळ नाही. असेही धर्मेंद्र प्रधान म्हणाले, तसेच यात आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेतही त्यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!