मुंबई : इंग्लंड विरुद्ध न्युझीलंड दोन्ही संघात लॉर्ड्स येथे सुरु असलेला पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला आहे. आखेरच्या दिवशी न्युझीलंडच्या संघाने ६ बाद १६९ धावांवर डाव घोषीत केला. चौथ्या डावात इंग्लंड समोर २७३ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडचा संघ ३ बाद १७० धावापर्यंत मजल मारु शकला. न्युझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवेला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या सामन्यात न्युझीलंड कडुन पदार्पण करणारा डेवॉन कॉनवेने अनेक विक्रम मोडीत काढले. या सामन्यातील दुसऱ्या डावात कॉनवेने केवळ 23 धावा काढल्या. या 23 धावा आणि पहिल्या डावातील द्विशतक अशा एकुण 223 धावा केल्यामुळे कॉनवेने पदार्पणात सलामीवीर म्हणून सर्वोच्च धावांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा विक्रम करताना त्याने 39 वर्षे जुना विश्वविक्रम मोडीत काढला. 1982 साली ऑस्ट्रेलियन सलामीवीर केप्लर वेसेल्स यांनी पदार्पणाच्या सामन्यात सलामीला खेळताना इंग्लंडविरुद्ध 208 धावा केल्या होत्या. तर या सामन्यात कॉनवेने दोन्ही डावात मिळुन 223 धावा केल्या आहेत.
तसेच कसोटी पदार्पणात सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत कॉनवे हा पाचव्या क्रमांकावर आहे. वेस्ट इंडिजचे लॉरेन्स रो हे 314 धावासंह पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. त्याचांपाठोपाठ आरइ फॉरेस्ट 306 धावासंह दुसऱ्या, यासिर हमिद 275 धावासंह तिसऱ्या आणि काईल मायर्स 270 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे. डेवॉन कॉनवे आता या यादीत पाचव्या क्रंमाकावर विराजमान आहे.
महत्वाच्या बातम्या
- गरिब कल्याण योजनेला मुदतवाढ, दिवाळीपर्यंत ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य
- नागपूर-मुंबई महामार्ग कामात शेतकऱ्यांचा खोडा, दिड किलोमीटरच्या कामात ‘सतराशे विघ्न’
- अनलॉक होताच नागरिकांना नियमांचा विसर! जागोजागाी ट्राफिक जॅम
- ‘महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या लाखापार’
- मोठी बातमी! २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार, मोदींची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

