🕒 1 min read
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणचा मुद्दा चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेक मराठा नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजे यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र, त्यांनी अद्याप वेळ दिली नसल्याने संभाजीराजे यांनी उघड नाराजी व्यक्त होती. दरम्यान, मराठा नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्याने राज्य सरकारवरील दबाव अधिक वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांची भेट मिळावी म्हणून पंतप्रधान कार्यालयाला विनंती केली होती.
आता पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती मान्य केली असून उद्धव ठाकरे यांना उद्या मंगळवारी भेटीची वेळी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणावर चर्चा करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील राहणार उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषद देखील होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना महा डीबीटी बियाण्यांची प्रतीक्षा, प्रशासनाचे मात्र शून्य नियोजन
- नागपूर-मुंबई महामार्ग कामात शेतकऱ्यांचा खोडा, दिड किलोमीटरच्या कामात ‘सतराशे विघ्न’
- अनलॉक होताच नागरिकांना नियमांचा विसर! जागोजागाी ट्राफिक जॅम
- ‘महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्रातील कोरोना मृत्यूंची संख्या लाखापार’
- मोठी बातमी! २१ जूनपासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत लस देणार, मोदींची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
