Share

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना महा डीबीटी बियाण्यांची प्रतीक्षा, प्रशासनाचे मात्र शून्य नियोजन

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर बियाणे वितरणासाठी सोयगाव तालुक्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत मक्यासाठी २०० हेक्टर आणि सोयाबीन तूर आदी पिकांसाठी प्रत्येकी २० हेक्‍टरचे पाच प्रकल्प हाती घेण्यात आली आहे. या योजनेत तालुक्यात १ हजार २८९ शेतकऱ्यांनी ऑनलाईन विविध वाणाच्या बियाण्यांची नोंदणी केली आहे. या योजनेच्या सोडतीचा मुहूर्त निघाला नसल्याने शेतकऱ्यांना बियाण्यांची प्रतिक्षा लागून आहे.

खरिपाचा हंगामाची चाहूल सुरू झालेली आहे. तरीही ऑनलाईन नोंदणी केलेल्या बियाण्यांची सोयगाव तालुक्यात शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे. या योजनेची सोडत पुण्यावरून निघत असते. त्यामुळे सोडतीचा अद्यापही मुहूर्त निघालेला नसून जूनच्या शेवटच्या आठवड्यात सोडत निघणार असल्याची माहिती हाती आली आहे. तोपर्यंत वेळ हातातून गेलेली असणार आहे.

त्यामुळे ऑनलाईन नोंदणी केलेल्या बियाण्यांची प्रतीक्षा न करता थेट कृषी केंद्रावरून बियाणे खरेदी करण्याची घाई शेतकऱ्यांनी केली आहे. खरीपाच्या धूळ पेरण्यांसाठी लागणाऱ्या सर्वच बियाण्यांची शेतकर्‍यांनी खरेदी केली आहे. त्यामुळे या योजनेचा उपयोग काय असा प्रश्न उत्तर शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.

सोडत तर दूरच परंतु योजनेच्या पूर्वतयारीसाठी तालुका कृषी विभागाकडे बियाणे उपलब्ध नसल्याने सोडतीमध्ये यादीत नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना संबंधित कृषी केंद्र चालकाकडे पाठविण्यात येऊन त्या कृषी केंद्राकडून बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. त्यामुळे पुण्याला सोडत निघाल्यावर ही सोडतीची यादी कृषी विभागाकडे सादर होण्यासाठी विलंब होणार आहे. त्यामुळे शासनाची बियाणे योजना कुचकामी ठरणार असल्याचे एकूणच चित्र निर्माण झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!