🕒 1 min read
सोलापूर – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत असून बीड मधील मोर्चाद्वारे एका मोठ्या लढाईची तयारी सुरु झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना आता सोलापूरमध्ये भव्य मोर्चा काढण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.
भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरून 16 जूनला कोल्हापुरात मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. कोल्हापूरनंतर 16 जूननंतर आता महाराष्ट्रातील दुसरा मराठा क्रांती मोर्चा हा सोलापुरात निघणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. यातच आता सोलापुरात संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्याची तयारी सुरु झाल्याची चर्चा आहे.
सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून आणखी एक भव्य मोर्चा काढण्याची तयारी सध्या सुरु आहे. यासाठी छत्रपती संभाजी राजे, उदयनराजे आणि नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा सुरु आहे. या तिघांच्या वेळा घेतल्यानंतर मोर्चाची तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. संभाजीराजे आणि उदयनराजे एकत्र आल्यास या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंच्या डोक्यात राजकारण नाही, ते समजदारवृत्तीने आंदोलन करतील – थोरात
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- कौतुक तर व्हायलाच पाहिजे : नितेश राणेंकडून मतदारसंघातील सर्व सरपंचांना विमाकवच
- ‘आमच्यावर कारवाई केली, मग ‘त्या; प्रकरणावरून मुख्यमंत्री ठाकरेंवरही गुन्हा दाखल करावा’
- ‘पहाटेच्या शपथविधीनंतर साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
