Share

लॉकअप शोमधिल ‘पायल रोहतगी’ अडकणार लग्नबंधनात, बॉयफ्रेंड केली लग्नाची तारीख जाहीर..

Published On: 

मुंबई : आपल्या अतरंगी आणि वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री पायल रोहतगी  लवकर लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती आहे. तिचा बॉयफ्रेंड संग्राम सिंहने ट्विट करत ही माहिती दिली आहे. पायल रोहतगी सध्या कंगना रनौतच्या  लॉकअप शोमध्ये  पहायला मिळतेय. यात ती बॉयफ्रेंड संग्राम सिंहसोबतच्या नात्यावर बोलती झाली. काही दिवसांआधी साखरपुडा झाल्याचं ती यावेळी म्हणाली. त्याचाच व्हीडिओ शेअर करत संग्रामने लग्नाची तारीख जाहीर केली आहे.

“पायल खूप चांगली मुलगी आहे. आम्ही खूप एकसारखे आहोत, एकसारखा विचार करतो. नात्यातील समानतेचा आम्ही आदर करतो. तसंच जगण्याचा प्रयत्न करतो. आम्ही मार्चमध्ये लग्न करणार होतो. पण पायल आता लॉकअप शोमध्ये आहे आणि मीही कामात थोडा बिझी आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे की माझ्या वाढदिवसाच्या आसपास आम्ही लग्न करू. देव सगळ्यांचं भलं करो”, असं ट्विट संग्रामने केलं आहे.

लॉकअप शोमध्ये पायल रोहतगी संग्राम आणि तिच्या नात्याबद्दल बोलती झाली. लॉकअपमध्ये ती रडत होती. यावेळी तिने संग्रामसोबच्या साखर पुड्यावर बोलली. “मी खूप दिवसांपूर्वी संग्रामसोबत साखरपुडा केला आहे. मला त्याच्यासोबत लग्नही करायचं आहे”, असं पायल म्हणाली.

महत्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!