🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: खासदार नवनीत राणा या राजकारणाबरोबरच समाजकारणातही अग्रेसर असतात. याबरोबरच त्या विविध गोष्टींमुळे चर्चेत देखील असतात. आजही नवनीत राणांच्या एका व्हिडिओची सर्वत्र चर्चा होत आहे. या व्हिडिओत आपल्याला नवनीत राणांचा फिल्मी अंदाज पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटाने सर्वांची मने जिंकली आहेत. याच चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग आणि गाण्यांवर रील्स बनवलेले आपण पहिले आहेत. त्यातच आता नवनीत राणांचा पुष्पा चित्रपटातील एक डायलॉग म्हणतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
नवनीत राणांना चढला 'पुष्पा' फिवर; व्हिडिओची चर्चा@navneetravirana #pushpa pic.twitter.com/K4D7EaW44R
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) March 20, 2022
हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वर आणि ट्विटरवर शेअर केला आहेत. “नवनीत नाम सूनके क्या लगा फ्लॉवर है, फ्लॉवर नही.. फायर है” असा डायलॉग त्यांनी या व्हिडिओत म्हटला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून लाईक आणि कंमेंट करण्यात येत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
