Share

NCP | आरोप, राडा, या सर्वांनंतर घोडगंगा साखर कारखन्यावर पवारांचं राज्य

Published On: 

🕒 1 min read

NCP | पुणे : घोडगांगा (Ghodganga) सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवर संपूर्ण पुणे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं होतं. या साखर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांचं गेल्या पाच वर्षांपासून वर्चस्व होतं. त्यांच्या या वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी विरोधकांकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात होते. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर अनेक गंभीर आरोप केले जात होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने दणदणीत विजय मिळवलाय.

शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवरुन तेथील स्थानिक राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काही ठिकाणी तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रचारसभेआधी विरोधकांनी त्यांच्या सभेस्थळी लावलेल्या पोस्टर्समुळे मोठा तणाव समोर आला होता. पण या सगळ्या गदारोळानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचाच विजय झालाय.

या निवडणुकीत किसान क्रांती पॅनेलवर 20-1 राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने असा दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक पवार यांचे या कारखान्यावर निर्विवाद वर्चस्व कायम राहीलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!