Share

Deepak Kesarkar | अब्दुल सत्तारांचा राजीनामा घेणार?; दीपक केसरकर म्हणाले,

Published On: 

Deepak Kesarkar | मुंबई :  शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्दात टीका केलीय. त्यांच्या या टीकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सत्तारांच्या या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. यावर दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी भाष्य केलं आहे.

ते म्हणाले, “राजीनामा मागण्याचा त्यांना अधिकार आहे का? देशद्रोहाचे आरोप आणि तुरुगांत असणाऱ्यांचे राजीनामे राष्ट्रवादीने दिले नाहीत. एखाद्या वक्तव्यावरून राजीनामा मागतात हे कितपत योग्य आहे. तुम्ही निषेध करा, माफी मागण्याची मागणी करा. त्यांच्याकडून चुकीचे वक्तव्य झालं असेल, तर माफी मागण्यात काही गैर नाही,” असेही दीपक केसकर (Deepak Kesarkar) यावेळी बोलताना म्हणाले.

“शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याबद्दल कोणीही वाईट अथवा व्यक्तिगत बोलू नये. शिंदे गटाच्या वतीने सुप्रिया सुळे यांची दिलगिरी व्यक्त करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अब्दुल सत्तार यांना समज देतील. कोणत्याही महिलेचा अपमान होऊ नये, अशी आमची भूमिका आहे,” असे दीपक केसरकर यांनी म्हटलं.

काय आहे प्रकरण?

तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं त्या म्हणाल्या आहेत. यावर तुम्ही  काय सांगाल? असं अब्दुल सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी दिलीय. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!