Share

Amol Kolhe । सत्तारांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचा निशाणा; म्हणाले, “या हीन दर्जाच्या भाषेचा…”

Published On: 

Amol Kolhe । मुंबई : अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरासमोरच शिवी दिली असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतंय. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी ट्विट करत अब्दुल सत्तार यांचा समाचार घेतला आहे.

अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, “कृषिमंत्री अब्दुलजी सत्तार, छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी प्रेरित करणाऱ्या माँ जिजाऊ एक महिलाच होत्या, ज्योतिबांना स्त्री शिक्षणासाठी साथ देणाऱ्या सावित्रीमाई एक महिलाच होत्या, लोककल्याणकारी राजकारणाचा वस्तुपाठ घालून देणाऱ्या अहिल्यादेवी एक महिलाच होत्या,” असा संदर्भ देत त्यांनी सत्तारांना सुनावलं आहे.

दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणतात, “इतिहासात डोकावून पाहिलं तर अशा अनेक महिलांनी राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे, त्यामुळे मंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशी विधानं करणं निषेधार्ह आहे. या हीन दर्जाच्या भाषेचा व नीच मानसिकतेचा मी तीव्र निषेध करतो.”

दरम्यान, “मी कोणत्याही महिलेबाबत अपशब्द काढलेले नाहीत. जे लोक आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबद्दल मी बोललो होते. सुप्रिया सुळे यांचे तसेच कोणत्याही महिलेचे मन दुखेल असा कोणताही शब्द मी बोललेलो नाही. मी बोलल्यामुळे महिला भगिनींची मनं दुखली असतील तर, मी जरूर खेद व्यक्त करेन. परंतु मी असे काहीही बोललेलो नाही,” असे स्पष्टीकरण अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिलंय.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!