Share

Eknath Khadse | एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तार यांना काहीतरी शिकवावे – एकनाथ खडसे

Published On: 

Eknath Khadse | जळगाव :  शिंदे गटाचे नेते राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवी दिली आहे. सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरा समोरच शिवी दिली. त्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीने राज्यभर आंदोलन सुरु केले आहेत. आमदार एकनाथ खडसे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

“सुप्रिया सुळे यांच्याबाबत अब्दुल सत्तार यांनी अत्यंत हीण दर्जाचे वक्तव्य केलेल आहे, त्याचा मी निषेध करतो, एखाद्या महिलेबद्दल, असा शब्द वापरणे म्हणजे संस्कारहीनचे लक्षण आहे. अब्दुल सत्तार यांच्या आई वडिलांनी त्यांच्यावरती नीट संस्कार केलेले दिसत नाहीत. म्हणून अब्दुल सत्तार असे वारंवार वक्तव्य करत आहेत. मला वाटतं एकनाथ शिंदे यांनी त्यांना काहीतरी शिकवण्याची गरज आहे, अब्दुल सत्तार यांनी तातडीने हा शब्द मागे घ्यावा आणि सुप्रिया सुळे यांची माफी मागावी”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

काय म्हणाले अब्दुल सत्तार – 

तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं त्या म्हणाल्या आहेत यावर तुम्ही  काय सांगाल? असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी दिली. “इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही (खोके) देऊ”, असे सत्तार म्हटले.

सत्तार पुढे म्हणाले, “भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!