Jitendra Awhad । मुंबई : शिंदे गटाचे नेते राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांना शिवी दिली आहे. सत्तार यांनी थेट सुप्रिया सुळेंना कॅमेरा समोरच शिवी दिली. त्यामुळे राजकारण चांगलच तापलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादीने राज्यभर आंदोलन सुरु केले आहेत. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यामध्ये आंदोलन करत राष्ट्रवादीने सत्तार यांचा निषेध केला. यावेळी आव्हाडांनी माध्यमांशी बोलताना अब्दुल सत्तार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “मी सत्तारांना जाणीव करुन देतो, सत्तार तुम्ही शिव्यांच्या ज्या शाळेत आहात ना त्याचे आम्ही सगळे मुख्याध्यापक आहोत. पण आमच्या तोंडातून ३५ वर्षाच्या राजकारणात कधीही कोणत्याही विरोधकाला अशी शिवी गेलेली नाही. तसेच आम्ही मुंबईच्या चाळी, गल्ल्यांमध्ये वाढलेलो आहोत. दर तिसऱ्या शब्दाला तोंडातून शिवी बाहेर पडायची. पण पवार साहेबांनी डोक्यावर हात ठेवल्यापासून तोंडातून शत्रूविरोधातही शिव्या निघत नाहीत,” असंही आव्हाड म्हणाले.
“सुप्रिया सुळेंच्याविरोधात नाही तर अत्यंतर गलिच्छ, नीच भाषेत त्यांनी टीका केलेली आहे. त्यांनी भिकार** हा शब्द वापरला आहे. महाराष्ट्राला कळावं म्हणून मी हे बोलतोय. यांची पातळी काय आहे. संस्कार काय आहेत. संस्कृती काय आहे. यांच्या जीभेवर महिलांबद्दल काय भाषा आहे. हे महाराष्ट्राला कळावं म्हणून मी हा शब्द उच्चारला,” असं म्हणत आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. “तो नमाज पठण करत नाही हे मला माहिती आहे. तो नेमका कोणत्या धर्माचं पालन करतो हेच मला कळत नाही,” असं आव्हाड यांनी एकेरी उल्लेख करत म्हटलं.
पुढे ते म्हणाले, “मी याहून पुढे जाऊन सांगतो. मनुवादाचा एवढा कट्टर समर्थक महाराष्ट्रात दुसरा कोणीही नाही. मनुवादाचा कट्टर समर्थक आहे अब्दुल सत्तार. कारण मनुवादामध्ये स्त्रियांना किंमतच नाही, स्थानच नाही अशी भूमिका मनूने मानली होती. तोच अब्दुल सत्तार ज्या इस्लाम धर्मातून येतो त्या इस्लाम धर्मात महिलांना काय सन्मान दिला जातो त्यांच्या तोंडूनच ऐका,” असं म्हणत आव्हाड यांनी एका मुस्लिम महिलेला प्रसारमाध्यमांशी बोलण्यास सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Amol Kolhe । सत्तारांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचा निशाणा; म्हणाले, “या हीन दर्जाच्या भाषेचा…”
- Health Care Tips | सर्दी खोकल्याच्या समस्या पासून त्रस्त आहात?, तर करा हे घरगुती उपाय
- Eknath Khadse | एकनाथ शिंदेंनी अब्दुल सत्तार यांना काहीतरी शिकवावे – एकनाथ खडसे
- Health Care Tips | हाडांना मजबूत करायचे असेल तर आहारात ‘या’ गोष्टींचा करा समावेश
- Aditya Thackeray । “अशी घाणेरडी लोकं…”; सत्तारांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे भडकले


