सातारा : दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन पॉपस्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी केलेल्या टिप्पणीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्याकडून अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर देण्यात आलं. “भारताच्या सार्वभौत्माविषयी कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. भारतामधील घडामोडींबाबत देशाबाहेरील लोक प्रेक्षक असू शकतात, पण त्यांनी हस्तक्षेप करता कामा नये”, असं सचिनने ट्विटमधून ठणकावून सांगितलं. मात्र, या ट्विटवरुन शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणाऱ्यांनी सचिनवर टीकास्त्र सोडलं आहे.
तर, भाजपसह कायद्यांचे समर्थन करणाऱ्या नेत्यांनी सचिनला पाठींबा दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘ज्यांना ज्या क्षेत्रातलं कळतं त्यातलं त्यांनी बोलावं’ असा सल्ला देत त्यांनी सचिन तेंडुलकरवर निशाणा साधला होता. पवारांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
‘शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते,’ असा टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. ‘शरद पवार कधी क्रिकेट खेळले होते का तरी ते अध्यक्ष होते. ते कोणत्या फडात कुस्ती खेळले? तरीही ते कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. अनेकांना वाटतं मला सोडून दुसऱ्याला कळत नाही. अशी कमी लेखण्याची पद्धत काही लोकांनी राज्यात लावली आहे. हे योग्य नसून नवीन नेतृत्वाला हानीकारक आहे.’ असं भाष्य खोत यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधताना केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- पिंपरी-चिंचवडमध्ये नाराज भाजप नगरसेवक अजितदादांच्या भेटीला; राजकीय भूकंपाची शक्यता !
- ‘सेलिब्रिटींना शेतीतलं काय कळत?’ : नवाब मलिक
- कारवाईसाठी गेलेल्या मनपाच्या स्वच्छता निरीक्षकाला दुध डेअरी चालकाची शिवीगाळ,गुन्हा दाखल
- प्रदेशाध्यक्ष होताच नाना पटोलेंना मोठा धक्का, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने सोपवला राजीनामा !
- अहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीत मोनिका राजळे बिनविरोध
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

