लखनौ – बारावीच्यापरीक्षा होणार कि नाही होणार ?असा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून बारावीच्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना पडलेला होता. काही दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षासंदर्भात केंद्र सरकारनं विविध राज्यांकडून सूचना आणि मतं मागवली होती. ती विचारात घेऊन येत्या परीक्षांसंदर्भात निर्णय घेतला जाईल असं केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी सांगितलं होतं.याच पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याअध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सुप्रीम कोर्टाला केंद्र सरकारनं दोन दिवसात निर्णय घेऊ असं म्हटलं होत. त्याप्रमाणं बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. देशातील वाढत्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता केंद्रानं हा निर्णय घेतला असल्याची माहिती सध्या मिळत आहे.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपवर या मुद्यावरून देखील निशाणा साधला आहे. असंवेदनशील भाजपा सरकारला अखेर परीक्षार्थी-पालकांच्या दबावापुढे झुकावे लागले आणि त्यांना सीबीएसईची बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आता इतर बोर्डाच्या आणि राज्य मंडळांच्या परीक्षादेखील याच आधारावर रद्द केल्या पाहिजेत. सर्व परीक्षार्थींना कोविड १९ चे लसीकरण केल्याशिवाय कोणतीही परीक्षा घेऊ नये, अशी मागणी देखील यादव यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- विराट सोबत अनुष्का-वामिका जाणार इंग्लंड दौऱ्यावर ?
- कधीही निवडणुका घ्या, शिवसेना घाबरत नाही; शिवसेनेचे भाजपला जोरदार प्रत्युत्तर
- दिलासादायक! राज्यात आज ३५,९४९ कोरोना रुग्ण बरे होऊन परतले घरी
- रस्ता रूंदीकरण प्रश्नी आ. सतीश चव्हाण यांनी घेतली अशोक चव्हाणांची भेट!
- ‘मोदींमुळे भाजप तर बाळासाहेबांमुळे शिवसेना सत्तेत’ -राज ठाकरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

