Share

पवारांनी तब्बल 15 पक्षांची बैठक बोलावली,’या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता

Published On: 

नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली आहे. यानंतर आता उद्या शरद पवारांच्या निवासस्थानीच विरोधी पक्षातील १५ ते २० बड्या नेत्यांची बैठक होणार आहे. या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

गेल्या दोन आठवड्यांत शरद पवार यांनी दोनदा प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. याआधी मुंबईतील शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पवार आणि किशोर यांची भेट झाली होती. आता उद्या पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी विरोधी पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे.

2018 मध्ये यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंच स्थापन केला होता. आता याच राष्ट्रमंचच्या बॅनरखाली एकत्र येण्यावर चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रीय जनता दल,तृणमूल, आम आदमी पक्षासह इतर पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत.

भाजपला केंद्रीय सत्तेपासून रोखण्यासाठी नेमकं काय करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय युपीए अध्यक्षपद शरद पवारांना देण्याबाबत तसेच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधून पवारांचा चेहरा पुढे करण्यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते अशी शक्यता आहे.

दरम्यान, उद्याच्या बैठकीला काँग्रेसला आमंत्रित करण्यात आलं की नाही याबाबतची माहिती मिळू शकली नाही. त्यामुळे उद्याच्या बैठकीला काँग्रेस उपस्थित राहणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. जर या पक्षांनी कॉंग्रेस शिवाय एकत्र येवून निवडणूक लढण्याची तयारी केली तर कॉंग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!