मुंबई : सेंट लुशीया येथे वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका संघादरम्यान दुसरा कसोटी सामना सुरु आहे. दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिजसमोर ३२४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. वेस्ट इंडिजकडे हे लक्ष्य गाठण्यासाठी २ दिवसाचा अवधी आहे. तिसऱ्या दिवसाअखेर वेस्ट इंडिजने बीनबाद १५ धावांची मजल मारली आहे.
या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण अफ्रिका संघाने पहिल्या डावात २९८ धावांची मजल मारली. क्विटंन डिकॉकने दक्षिण अफ्रिकेकडुन सर्वाधीक ९६ धावांची खेळी केली तर वेस्ट इंडिजकडून काईल मेयर आणि केमार रोच यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव १४९ धावांवर अटोपला. वेस्ट इंडिजकडुन जेर्मेन ब्लॅकवुडने सर्वाधीक ४९ धावांची खेळी केली. तर दक्षिण अफ्रिकेकडून वियान मुलदरने सर्वाधीक ३ गडी बाद केले.
यासह दक्षिण अफ्रिकेला पहिल्या डावात १४९ धावांची आघाडी मिळाली. मात्र पहिल्या डावाप्रमाणे दक्षिण अफ्रिकेचा दुसरा डाव यशस्वी नाही ठरला. केवळ १७४ धावांत दक्षिण अफ्रिकेचा संपुर्ण संघ माघारी तंबुत परतला. वॅन डर डसेनने दक्षिण अफ्रिकेकडुन सर्वाधीक ७५ धावांची नाबाद खेळी साकारली. तर वेस्ट इंडिजकडुन केमार रोचने सर्वाधीक ४ गडी बाद केले. पहिल्या डावातील १४९ धावाच्या आघाडीच्या जोरावर दक्षिण अफ्रिकेने वेस्ट इंडिज समोर ३२४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सामना संपायला अद्याप २ दिवसाचा अवधी बाकी असल्याने वेस्ट इंडिजकडे सामना जिंकण्याची नामी संधी आहे.
महत्वाच्या बातम्या
- चालू सामन्यात कर्णधार कोहली इशांतला म्हणाला, ‘विचारतोयस का ओरडतोयस?’
- मराठा आंदोलनाची दिशा उद्या नाशकातून ठरणार
- मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटलांची पुनर्विचार याचिका
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली काय?’, सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

