🕒 1 min read
मुंबई : अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष लागुन राहिलेल्या जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि न्युझीलंड दरम्यान साउथहॅम्पटन येथे सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी न्युझीलंडने भारतीय संघाला पहिल्या डावात २१७ धावांवर रोखले. न्युझीलंडने त्याच्या पहिल्या डावात चांगली सुरुवात केली आहे. तिसऱ्या दिवसाअखेर न्युझीलंडची स्थिती १०१ वर २ बाद अशी होती.
या सामन्याच्या दरम्यान आयसीसीशी बोलताना आर आश्विनने निवृत्तीबद्दल मोठे भाष्य केले आहे. यावेळी तो म्हणाला,’कसोटी क्रिकेटमध्ये कायम सर्वोकृष्ट योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी मी कधीही तडजोड केली नाही. सर्वोत्कृष्ट देण्याच्या या प्रयत्नामुळेच मी येथे पोहोचलो आहे. ज्या दिवशी मला वाटेल की मी सर्वोत्कृष्ट देऊ शकत नाही. त्यादिवशी मी क्रिकेट खेळण सोडुन देईन’ असे वक्तव्य केले आहे.
३४ वर्षिय आर अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ४०९ गडी बाद केले आहे. आश्विन सध्या न्युझीलंड विरुद्ध जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळत आहे. काही दिवसापुर्वी संजय मांजरेकरने त्याला सर्वकालीन महान क्रिकेटपटु मानन्यापासुन नकार दिल्याने ट्विटरवर वाद उत्पन्न झाला होता.
महत्वाच्या बातम्या
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- मराठा आंदोलनाची दिशा उद्या नाशकातून ठरणार
- मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात विनोद पाटलांची पुनर्विचार याचिका
- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली काय?’, सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना सवाल
- ‘…तर पुन्हा कपडे उतरवणार’ ; डब्ल्यूटीसी फायनल वर पूनम पांडेचे नवे भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
