Share

प्रताप सरनाईकांच्या पत्रामुळे भाजप नेत्यांना होऊ लागल्या गुदगुल्या

Published On: 

🕒 1 min read

पुणे – गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात गेलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा करतानाच भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं आहे. भाजपशी युती केल्यावर शिवसेनेला फायदा होईलच. शिवाय आमच्या सारख्यांना होणारा त्रासही वाचेल, असा दावाही सरनाईक यांनी केला आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २ पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे.

दरम्यान, या पत्रानंतर भाजपच्या काही नेत्यांना गुदगुल्या होऊ लागल्याचे दिसून येत आहे. भाजपमधीलकाही नेत्यांनी या पत्राचे स्वागत केले आहे, काही नेते हे पुन्हा युती होऊ शकते ही कल्पना करूनच हुरळून गेल्याचे दिसत आहे तर काहींनी सावध भूमिका घेतली आहे.

सरनाईक यांच्या पत्रावर खासदार गिरीश बापट यांनी प्रतिक्रिया दिली. यात ते म्हणाले, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी राजकीय भीतीच्या पलीकडे जाऊन त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यांची ही प्रतिक्रिया बोलकी आहे. हिंदुत्वावर आधारित भाजप शिवसेनेची युती होती. ती युती पुढेही होऊ शकते. कारण हिंदुत्व हा आपला श्वास आहे आणि प्रताप सरनाईक यांनी जे पत्रात म्हटलं आहे ते सर्वांच्या मनातील बोलले आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपाची युती झाल्यास भाजपाच्या कार्यकर्त्यांनाही आनंद होईल.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील याबाबत ते प्रतिक्रिया देताना म्हणाले, प्रताप सरनाईक हे त्यांचे नेते आहेत. आमदार आहेत. उद्धवजींनी त्यांच्या विनंतीचा विचार केला, तर आमचे नेतेही वर बसलेले आहेत. तेही विचार करतील. आता प्रताप सरनाईक यांना वाटतंय. तेच आम्ही १८ महिन्यांपूर्वी घसा फोडून सांगत होतो. त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेबांनी आयुष्य घालवलं. त्यांच्याबरोबर सत्तेत का बसता? हेच आम्ही सांगत होतो.”, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

या संदर्भात प्रसाद लाड यांनी सोशल मीडियावर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, ‘हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. मात्र, प्रताप सरनाईक यांच्या पत्राकडे उद्धवजिंनी मुख्यमंत्री म्हणून नाही तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून पहावे. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे, त्यांचा निर्णय त्यांनीच घ्यावा…!! असे लाड यांनी म्हटले आहे.

काही नेत्यांना युतीच्या शक्यतेमुळे आनंद झाला तर काहींना शिवसेनेला खिंडीत पकडण्याची आणखी एक संधी मिळाल्यामुळे आनंद झाला. भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत ‘सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर …. जेलचे पाहुणे होणारच’ असा टोला लगावला आहे. ‘शिवेसेनाचे आमदार प्रताप सरनाईक “जेल” चा भीतीने चिंताग्रस्त दिसत आहेत आणि आता सरनाईकनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा यांच्याशी हातमिळवणी करावी अशी विनवणी केली आहे सर्व घोटाळेबाज प्रताप सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर… जेलचे पाहुणे होणारच’ असे सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान, युतीच्या शक्यतेमुळे काही मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले असले तरीही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र लक्ष्यवेधी प्रतिक्रिया दिली. शिवसेना-भाजप युती व्हावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. मात्र आमचं स्पष्ट मत आहे की, शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना काय उत्तर द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहोत. जनतेचे प्रश्न आम्ही मांडत आहोत. सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो, पण बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.भाजप स्वबळावरच लढत आहे. कुणी कोणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे हे त्यांनी ठरवायचे आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला. आता कुणासोबत कुणी जायचं हे  त्यांनी ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. जनतेच्या बांधीलकीतून आम्ही काम करत राहू, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

दरम्यान,आगामी काळात भाजप स्वबळावर महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेवरून दिसून येत आहे. यामुळेच आता पुन्हा अशी युतीची चर्चा सुरु होताच फडणवीस यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला असून पुढील मनसुबे देखील स्पष्ट केले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!