🕒 1 min read
मुंबई : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेनं भाजपची साथ सोडली आणि भिन्न विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. यानंतर, भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रचंड कटुता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मुंबईत झालेला राडा ताजा असतानाच शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्ब’ ने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
९ जून रोजी लिहिलेलं हे पत्र असून राष्ट्रवादी-काँग्रेसवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आपले कार्यकर्ते फोडत असून आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असं सरनाईक म्हणाले आहेत.
प्रताप सरनाईक यांच्या लेटर बॉम्बनंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेतील गट-तटावर भाष्य केले आहे. शिवसेनेत दोन गट आहेत का? असा प्रश्न संजय राऊत यांना विचारला असता ते म्हणाले, ‘आमच्या पक्षात कोणतेही गट नाहीत. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट आहे. उद्धव ठाकरे प्रमुख आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही’.
महत्वाच्या बातम्या
- डब्ल्युटीसी फायनल! यामुळे भारतीय फलंदाज अपयशी?
- ‘कसोटी चॅम्पियनशीप गेली खड्डयात पण….’ सोशल मीडीयावर विराटकडे केली ‘ही’ मागणी
- ओबीसींचे आक्रोश मोर्चे मराठ्यांच्याविरोधात नाहीत, दोन्ही समाज अडचणीत – छगन भुजबळ
- ‘द ग्रेट खली’च्या आईचे दिर्घ आजारामुळे निधन
- ‘आणि आई ठणठणीत बरी झाली’, योगामुळे आईने गंभीर आजारावर मात केल्याचा कंगणाचा अजब दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
