Share

पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी केला डिटोनेटरचा मोठा साठा जप्त 

Published On: 

परभणी : बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी दैठणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सिंगनापूर परिसरात मोठ्या प्रमाणात डिटोनेटर्स जप्त केले. यात एका व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या पकरणी दैठणा पोलिस अधिक तपास करत आहे.

शहर वाहतूक शाखेचे फौजदार चंद्रचूड हत्तेकर हे कर्मचारी गायकवाड, मुजीब यांच्यासह बुधवारी मध्यरात्री पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी मध्यरात्री दोनच्या सुमारास सिंगनापूर शिवारात 2 व्यक्ती मोटरसायकलवरुन जाताना दिसले. त्यांनी त्या दोघांना थांबन्यास सांगितले. तर त्यावेळी ते मोटरसायकलवरील एक व्यक्ती पळून गेली. तर अन्य एकास चंद्रचुड हत्तेकर यांनी तातडीने झडप घालून पकडले. त्याच्याजवळील सामानाची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याजवळ डिटोनेटरचा मोठा साठा त्यांना आढळला.

त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव सुभाष दगड़ू चव्हाण असे सांगितले.  पळून गेलेली व्यक्ती राजस्थानी आहे. त्याच्याबद्दल अधिक माहिती सांगितली नाही. फौजदार हत्तेकर यांनी त्यास पकडून दैठणा पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, फौजदार हत्तेकर यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. या तक्रारीमध्ये म्हटले आहे की,  एमएच 19 ए- झेड 8658 या क्रमांकाच्या मोटरसायकलवरुन डिटोनेटर्स नेत असताना दोघे आढळले. मात्र एक जण फरार झाला. अन्य सुभाष दगड़ू चव्हाण यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील 8 पॉकेट डिटोनेटर्सही जप्त केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी दैठणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास फौजदार अनिल आदोडे करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!