Share

८० वर्षीय धाडसी वृद्धाचे देशप्रेम! युक्रेनच्या सैन्यात भरती होण्यासाठी रांगेत उभा, फोटो व्हायरल

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : युक्रेन आणि रशियामधील वाढत्या तणाव दरम्यान सोशल मीडिया युक्रेनमधील नागरिकांच्या हृदयद्रावक फोटोंनी भरला आहे. युक्रेनमधील सबवे स्टेशनवर एका जोडप्याचा निरोप घेण्याच्या व्हायरल फोटोपासून, वडील आणि मुलगी एकमेकांना मिठी मारून रडत आहेत, अशा दृश्यांनी लोकांना धक्का दिला आहे.

दरम्यान, युक्रेनच्या सैन्यात भरती होण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या वृद्धाचा फोटो व्हायरल होत आहे. कतरिना युश्चेन्को यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या फोटोत एक वृद्ध व्यक्ती बॅग घेऊन उभा आहे, सैन्यात भरती होण्यासाठी तयार आहे. त्यांच्या पिशवीत असलेल्या वस्तू तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणेल.

ट्विटरवर शेअर केलेल्या पोस्टसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “कोणीतरी या ८० वर्षाच्या व्यक्तीचा फोटो पोस्ट केला आहे जो सैन्यात भरती होताना दिसत आहे, त्याच्या बॅगमध्ये ३ टी-शर्ट, पॅंट, एक टूथब्रश आणि लंच होते काही सँडविच होते. आपण आपल्या नातवंडांसाठी हे करत असल्याचे त्याने सांगितले.

या धाडसी वृद्धाचे देशावरील प्रेमाचे कौतुक करण्यापासून लोक स्वतःला रोखू शकत नाहीत. या फोटोला आतापर्यंत २ लाखांहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!