सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील सिम्युलेटर कक्षाचे उद्घाटन परिवहन व संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांच्या हस्ते आज पार पडले. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेंडसिकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, वाहतूक संघटनांचे पदाधिकारी शिवाजी घोगळे, यांच्यासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी सिम्युलेटर कक्षाचे उद्घाटन करून येथील सिम्युलेटर वाहन स्वतः चालवून त्याचे परीक्षण केले. त्यानंतर बोलताना मंत्री अनिल परब म्हणाले, येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेंडसिकर हे २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होत असले तरी या ठिकाणी लवकरच पूर्णवेळ अधिकारी पाठवू. महाराष्ट्र माझा आहे, पण मी सिंधुदुर्गाचा आहे. त्यामुळे येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांची रिक्त पदे राहणार नाहीत. याची खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही परबांनी दिली.
महत्वाच्या बातम्या:
भविष्यात भाजप-सेना एकत्र येणार का?; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले…
केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडींच्या हातातील हत्यारे- संजय राऊत
पाकिस्तान दौऱ्यासाठी जाण्याआधी डेव्हिड वॉर्नरने केली परिवारासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…
“कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा, पण…”, अजित पवार भडकले
“…यावर भाजपवाले तोंड का उचकटत नाहीत?”, संजय राऊतांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

