🕒 1 min read
मुंबई: लखनऊ मध्ये झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या T20I मालिकेतील सलामीच्या लढतीत भारताने ६२ धावांनी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात सात गोलंदाजांचा उपयोग केला. या सामन्यात मात्र श्रेयस अय्यरनेही गोलदांजी करायची मागणी केली होती. तसेच त्याने यासंबंधी T20I उपकर्णधार जसप्रीत बुमराह यांच्याशी झालेल्या संभाषणाचा देखील खुलासा केला आहे.
बुमराह व्यतिरिक्त, भारताकडे वरिष्ठ वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा आणि दीपक हुडा होते ज्यांनी गुरुवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सहा विकेट्स घेतल्या. मात्र , डेथ ओव्हर्स सुरू होण्यापूर्वी, श्रेयस अय्यरने (shreyas iyer) उघड केले की त्याने बुमराहशी डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याची इच्छा जाहीर केली होती. तो म्हणाला “”मी आधीच माझा हात (बॉलसाठी) वर ठेवला होता. १६ व्या षटकाच्या सुमारास जेव्हा रोहित बाहेर गेला तेव्हा त्याने बुमराहला आधीच सांगितले होते की हे गोलंदाज आहेत ज्यांना गोलंदाजी करायची आहे. मी बुमराहला लाच देण्याचा प्रयत्न केला पण ते कामी आले नाही.
श्रेयसने यापूर्वी गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेदरम्यान एका सामन्यात सहाव्या गोलंदाजीचा पर्याय म्हणून काम केले होते. श्रीलंका विरुद्ध पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजानी चांगली कामगिरी केली आहे. मालिकेत १-० ने आघाडी घेतल्याने, मालिका जिंकण्याच्या उद्देशाने भारत आज (२६ फेब्रुवारीला ) दुसऱ्या T20 सामन्यात उतरेल.
महत्वाच्या बातम्या
- “…यावर भाजपवाले तोंड का उचकटत नाहीत?”, संजय राऊतांचा हल्लाबोल
- “कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा, पण…”, अजित पवार भडकले
- पाकिस्तान दौऱ्यासाठी जाण्याआधी डेव्हिड वॉर्नरने केली परिवारासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…
- केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडींच्या हातातील हत्यारे- संजय राऊत
- भविष्यात भाजप-सेना एकत्र येणार का?; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
