🕒 1 min read
मुंबई : एका कार्यक्रमात बोलत असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारवर आणि भाजपवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच यावेळी त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे (Aaditya Thackeray) राजकीय भवितव्य कसे असेल यासंदर्भातही भाष्य केले.
यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की,‘आमच्यावर कुणीही राजकारण लादलेले नसून त्या काळी माझीही आदित्यसारखीच राजकारणात सुरुवात झाली. घरात जन्मापासून जे वारे वाहतात, ते अंगात भिनतात’, असे ठाकरे म्हणाले.
दरम्यान, पुढे बाळासाहेबांविषयी सांगत ते म्हणाले की,‘मला बाळासाहेब म्हणाले होते की उद्धव एक लक्षात ठेव. तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला शिवसैनिकांवर लादणार नाही. जनतेवर लादणार नाही. पण तू माझा मुलगा आहेस म्हणून मी तुला अडवणार देखील नाही. जर तुला जनतेने स्वीकारले तर तू तुझ्या वाटेनं पुढे जा.’ तसेच आता आदित्य त्याच्या वाटेने पुढे जातोय.लोकांना पटलं तर ते त्याला स्वीकारतील, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
“…तर आता तुमच्याही ‘डर्टी बारा’चे बारा वाजल्याशिवाय राहणार नाही”, संजय राऊतांचा इशारा
-
“मी बुमराहला गोलंदाजीसाठी लाच देण्याचा प्रयत्न केला”; भारतीय खेळाडूचा खुलासा
-
पाकिस्तान दौऱ्यासाठी जाण्याआधी डेव्हिड वॉर्नरने केली परिवारासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…
-
“कुत्र्याला तुम्हाला घरात काय गादीवर जवळ घेऊन झोपायच ते झोपा, पण…”, अजित पवार भडकले
-
“…यावर भाजपवाले तोंड का उचकटत नाहीत?”, संजय राऊतांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
