🕒 1 min read
पुणे : सध्या केंद्रीय तपास यंत्रणेच्या छापेमारीमुळे भाजप महाविकास आघाडी सरकारला निशाण्यावर धरत आहे. आता यासर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Ajit Pawar Reaction) एक पक्ष सोडून बाकीच्यांवर धाडी पडत आहेत. असा टोला त्यांनी लगावला आहे.
नवाब मलिक यांच्या अटकेवर अजित पवार म्हणाले की, “नवाब मलिक हे प्रकरण १९९३ चे आहे. आरोप प्रत्यारोप होणारच आहेत. आम्ही आमची काम करत आहोत. एक पक्ष सोडून बाकी पक्षांवर धाड पडते. मात्र सरकार येतात सरकार जातात. हे सर्व काही द्वेष भावनेतून सुरु आहे. तसेच सरकार पडेल याबाबत कोण काय तारखा देतं याला काही महत्व नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली. जो पर्यंत १४५ फिगर आहे. जोंपर्यंत शरद पवारसाहेब, सोनिया गांधी, उद्धव ठाकरे आहेत तोपर्यंत हे सरकार चालणार ही काळया दगडाची रेष आहे.”
दरम्यान पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, “पंतप्रधानपद यांचा मान राखला पाहिजे. निदर्शनं, आंदोलन वेगळं. मात्र त्यांचा आदर केला पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या:
-
भविष्यात भाजप-सेना एकत्र येणार का?; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले…
-
केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे शिखंडींच्या हातातील हत्यारे- संजय राऊत
-
पाकिस्तान दौऱ्यासाठी जाण्याआधी डेव्हिड वॉर्नरने केली परिवारासाठी भावनिक पोस्ट; म्हणाला…
-
“लोकांनी तुम्हाला बुडवण्याचा निश्चय केला असेल तर..”, भातखळ करांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा
-
…तेव्हा महाआघाडीतील नेते एकदम चिडीचूप गप्प बसले होते- केशव उपाध्ये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
