बीड: जिल्ह्यातील मानकूरवाडी येथील धक्कादायक घटना समोर आली आहे. मानकूरवाडीचे पोलिस पाटील भीमराव ससाणे यांच्या डोक्यात खोरे मारून त्यांचं निरघुण खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गावातील एक व्यक्ती व त्याचे दोन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानकूरवाडी येथील ढेकणमोह्यात ही घटना गुरुवारी रात्री ८:३० च्या सुमारास घडली होती.
भीमराव ससाणेंचा मुलगा संतोषच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी रात्री ८.३० वा. गावातील रवी मुरलीधर शिंदे याने भाऊ कृष्णा ससाणेला बोलावून सोबत घेऊन गेला. थोड्या वेळाने ते दोघे परतल्यानंतर कृष्णाच्या बोटाला जखम दिसून आल्याने संतोषने रवीच्या गचुरीला धरून त्याबाबत जाब विचारला. याचा राग आल्याने तुम्हाला बघून घेतो अशी धमकी देत शिवीगाळ करत रवी तिथून निघून गेला. त्यानंतर कृष्णाला बीडच्या रुग्णालयात पाठवून संतोष व भीमराव हे घरासमोर थांबले.
संतोष आणि भीमराव घरासमोर थांबले असताना तेवढ्यात रवी मुरलीधर शिंदे, त्याचा भाऊ दीपक मुरलीधर शिंदे व त्याचे वडील मुरलीधर लिंबाजी शिंदे हे तिघे खोरे, काठ्या घेऊन तिथे आले आणि त्यांनी संतोष व भीमराव यांच्यावर हल्ला चढवला. यावेळी रवीने खोरे डोक्यात मारल्याने भीमराव जागीच कोसळले. तरीही त्यांनी संतोष व भीमराव यांना मारहाण सुरूच ठेवली. भांडण सोडवण्यासाठी आलेली भीमराव यांची पत्नी सुशीला यांनाही मारहाण केली. ग्रामस्थ धावत आल्याने हल्लेखोर पळून गेले.
यावेळी १०८ रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी भीमराव यांना तपासून मृत झाल्याचे सांगितले. घटनेबाबत माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून भीमराव यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी रवी मुरलीधर शिंदे, भाऊ दीपक मुरलीधर शिंदे, मुरलीधर लिंबाजी शिंदे यांच्यावर पिंपळनेर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला.
महत्वाच्या बातम्या
- संताप: रोहित्रात बिघाड झाल्याने पूर्ण तालुका अंधारात, आंदोलनाचा इशारा
- जया बच्चन करणार आता वेब सीरिजमध्ये पदार्पण
- प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमी वादग्रस्त का बोलत असतात ?
- ‘झाडं लावा, जंगल वाचवा!’, धोनीला संदेश देणं पडलं महागात
- सलमानशी पंगा पडला महागात; केआरकेने मागितली माफी


