मुंबई : अभिनेता कमाल रशिद खान नेहमी त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. मात्र त्याच्या या वक्तव्यामुळे तो अनेकवेळा अडचणीत देखील सापडला आहे. मध्यंतरी कमाल रशिद खान याच्यावर ‘राधे’ चित्रपटाच्या रिव्ह्यू संदर्भात अभिनेता सलमान खानने मुंबई कोर्टात मानहानीचा दावा केला.
यासंदर्भात अभिनेता कमाल रशिद खानला नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरु झाली. या प्रकरणी आता कोर्टानं केआरकेला सलमान विरोधात कोणतीही पोस्ट शेअर करण्यास मनाई केली आहे. यावर केआरकेने सलमानची माफी मागितली आहे.
Your team can notify me if I have left any video on my channel which offends you, so that I can delete that video also.
— KRK (@kamaalrkhan) June 25, 2021
त्याने ट्विट् करत लिहिले की, ‘प्रिय मित्रा सलमान खान, मी तुझ्यावरील सर्व व्हिडीओ डिलिट केले आहेत. तुझ्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी तुझ्याविरुद्धची लढाई कोर्टात सुरू ठेवेन. यापुढे कोर्टाच्या परवानगीशिवाय मी तुझ्या चित्रपटांचा रिव्ह्यू करणार नाही. तुला तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा. जर एखादा व्हिडीओ डिलिट करायचा राहिला असेल तर मला सांग मी तो काढून टाकतो.’ असे दोन ट्विट्स करत कमाल खाननं सलमानची माफी मागितली आहे.
कमाल खानने सलमान खान आणि त्याच्या अनेक गोष्टींविरोधात केलेल्या बदनामीमुळे मानहानीची केस करण्यात आली होती. यात त्याच्या वकिलाने म्हटलं की, ‘कमाल खान सातत्याने सलमान खानची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच बदनामी करण्याच्या हेतूने खोटे आरोपही करत आहे. याशिवाय तो सलमान खानचा ब्रँड बीइंग ह्युमनलाही तर फ्रॉड म्हटला आहे. तसेच या ब्रँडतर्फे पैसे दाबले गेले असही त्याने म्हटलं होत.’ तसेच त्याने ‘सलमान खान आणि सलमान खान फिल्म्स हे एक गुंड आहेत.’अशीही बदनामी केली होती. त्यानंतर आता कोर्टानं केआरकेला सलमान विरोधात कोणतीही पोस्ट शेअर न करण्यास सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- …म्हणून ‘बाबा का ढाबा’च्या मालकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
- पेशावरला नमवत मुल्तानने पहिल्यांदाच पटकावले पीएसएल स्पर्धचे विजेतेपद
- ‘पुढील सामन्यात स्थान मिळेल का?’ सॅम करनने केले ट्विट
- पायल रोहतगीच्या अटकेवर मित्र संग्राम सिंग याचा मोठा खुलासा, म्हणाला…
- ‘युरो कप’चा फिवर पोहोचला क्रिकेटच्या मैदानात; इंग्लंड-श्रीलंका सामन्यात आली प्रचिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

