Share

प्रज्ञा सिंह ठाकूर या नेहमी वादग्रस्त का बोलत असतात ?

Published On: 

भोपाळ – भोपाळमधील भाजपच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. त्यांनी यापूर्वी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपची कोंडीही झाली आहे. कधी कधी तर असं काही त्या बोलून जातात की त्यामुळे त्यांचे डोके ठिकाणावर आहे की नाही असा सवाल देखील उपस्थित केला जातो. आता प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले आयपीएस अधिकारी हेमंत करकरे  यांच्याबद्दल पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

यासंबंधी एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणतात की,  हेमंत करकरे यांना काही लोक देशभक्त मानतात. पण खरे देशभक्त असलेले लोक त्यांना देशभक्त मानत नाहीत. देशासाठी मी माझं जीवन समर्पित केलं आहे. माझ्यासारख्या स्वयंसेवकाला त्यांनी त्रास दिला. देशात एक आणिबाणी 1975 साली लागली होती. तशाच प्रकारची आणखी एक आणिबाणी  ही 2008 साली लागल्याचं सांगत आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा आरोपही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केला. आपल्याला शिक्षण देणाऱ्या आचार्यांच्या हाताची बोटं हेमंत करकरे यांनी तोडल्याचंही प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितलं.

यापूर्वी देखील प्रज्ञा सिंह यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. काहींच्या मते त्यांच्यावर झालेल्या अन्यायामुळे त्या एवढे टोकाचे बोलत असतात तर काहींच्या मते कट्टरता या मुद्द्यामुळे त्यांच्याकडून अशी वक्तव्ये वारंवार केली जातात. काही दिवसांपूर्वी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणारे नथुराम गोडसे हे देशभक्त आहेत, असे विधान केले होते. साध्वी यांच्या या विधानामुळे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सदस्यपदावरूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली. याशिवाय यापूर्वी कोरोना बाबत बोलताना देखील त्यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. कोरोनामुळे होणारा फुफ्फुसातील संसर्ग गोमूत्र प्यायल्याने बरा होऊ शकतो, असे त्या म्हणाल्या होत्या.

कुटुंब नियोजनाबाबत देखील त्यांनी यापूर्वी काही वादग्रस्त वक्तव्ये केली होती. त्या म्हणाल्या होत्या, प्राचीन काळामध्ये समाजातील सर्व कामे वर्णव्यवस्थेनुसार केली जात होती. त्यामुळे राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्या जनसमूदायाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे. क्षत्रिय हे देशाचे रक्षण करतात, त्यामुळे त्यांनी अधिक मुलं जन्माला घालायला हवीत. अस त्यांनी म्हटलं होते.एमपीचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांच्या निधनानंतर देखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.

याशिवाय मध्यप्रदेशातील सीहोर येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वच्छतेविषयी प्रश्नाला उत्तर देतानादेखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या म्हणाल्या होत्या, ‘आम्ही गटारं साफ करण्यासाठी नाही आहोत. ठीक आहे ना? आम्ही तुमचं शौचालय स्वच्छ करण्यासाठी अजिबातच नाही निवडून आलो. आम्ही जे काम करण्यासाठी निवडलो गेलो आहोत, ते काम आम्ही इमानदारीने करु. असं आम्ही पूर्वीही म्हणत होतो. आजही त्यावर ठाम आहोत आणि उद्याही आमचं म्हणणं तेच असेल’.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!