मुंबई : बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन ह्या आपल्या रागीट स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असतात. कोणत्या न कोणत्या कारणामुळे त्या सोशल मीडियावर ट्रेंडचा विषय बनतात. जया बच्चन त्यांच्या वक्त्यव्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्या डिजिटल विश्वात पदार्पण करत असल्याने त्यांची चर्चा सुरु झाली आहे.
जया बच्चन या लवकरच ‘सदाबहार’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. त्यानंतर आता या सीरिजचे फेब्रवारी महिन्यात चित्रीकरण देखील सुरु केले आहे. मात्र जया बच्चन किंवा सीरिजच्या निर्मात्यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
जया बच्चन या ‘सदाबहार’ या सीरिजमध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. त्या २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘की और का’ या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात अर्जुन कपूर आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर त्या चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय नव्हत्या. जवळपास ५ वर्षांनंतर जया बच्चन या प्रेक्षकांना स्क्रीनवर पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग त्यांना पुन्हा काम करताना पाहण्यास उत्सुक आहे.
महत्वाच्या बातम्या
- जालन्यात उभारला मराठवाड्यातील पहिला पीएसए ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प!
- ‘पुढील सामन्यात स्थान मिळेल का?’ सॅम करनने केले ट्विट
- ‘युरो कप’चा फिवर पोहोचला क्रिकेटच्या मैदानात; इंग्लंड-श्रीलंका सामन्यात आली प्रचिती
- पायल रोहतगीच्या अटकेवर मित्र संग्राम सिंग याचा मोठा खुलासा, म्हणाला…
- ‘युरो कप’चा फिवर पोहोचला क्रिकेटच्या मैदानात; इंग्लंड-श्रीलंका सामन्यात आली प्रचिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

