Share

संताप: रोहित्रात बिघाड झाल्याने पूर्ण तालुका अंधारात, आंदोलनाचा इशारा

Published On: 

बीड: जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रात बिघाड झाल्याने १० दिवसांपासून वीज पुरवठा खंडित झाला आहे, त्यामुळे अर्धा तालुका अंधारात आहे. वीज नसल्याने पण्याची टंचाईचा देखील येथील ग्रामस्थांना सामना करावा लागत आहे. महावितरणने उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफार्मर दुरूस्ती करून वीज पुरवठा सुरळीत सुरू करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

वडवणी ३३ के.व्ही.सबस्टेशन अंतर्गत साळींबा फिडर मधील, मामला, चिंचोटी, कान्हापुर, लक्ष्मीपुर, ढोरवाडी सह दहा गावे व वाड्या, वस्त्यांना विज पुरवठा करणारे मुख्य रोहित्र नादुरुस्त झाल्याने गेल्या दहा दिवसांपासून या गावातील विज पुरवठा खंडित झाला आहे. हे गावे महावितरणच्या कर्मचारी यांच्या हलगर्जीपणा मुळे अंधारात आहेत. नागरिकांना पाणी, दळण आणण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. महावितरणचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष नसल्याने जनतेमधून यंत्रणेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

आमदार सोळंके यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ सूचना देऊन पावर ट्रान्सफार्मर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. यासाठी गावातील नागरिकांनी आंदोलनाचा देखील इशारा दिला आहे. मुख्य पॉवर ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाला आहे. तो ट्रान्सफार्मर औरंगाबाद, नाशिक, लातूर येथे दुरुस्त केला जातो. लवकर दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत करू. पर्यायी व्यवस्था म्हणून देवडी, चिंचाळा उपकेंद्रातून काही तास वीजपुरवठा करत असल्याची माहिती महावितरण अभियंता एस.बी.चव्हाण यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!