🕒 1 min read
औरंगाबाद: औरंगाबाद शनिवारी रात्री पासून लागलेल्या एका बॅनरने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हे बॅनर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहे. ‘निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे’ शहरातील मुख्य ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मुख्यत्वे करून यामध्ये जातीची कुठलीही अट नसून आपल्याला तीन मुले असल्या कारणाने आपण निवडणूक लढवू शकत नाही त्यामुळे लढाऊ उमेदवार पाहिजे असा मजकूर या बॅनरवर छापण्यात आले आहे.
रमेश विनायकराव पाटील(Ramesh Patil) यांनी शहरातील वर्दळीच्या तीन ठिकाणी हे बॅनर लावले आहे. येणाऱ्या काही महिन्यात औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक होऊ शकते. या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आले आहे. गुलमंडी येथील रहिवासी असलेल्या पाटील यांना तीन मुले आहेत. त्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. तीन अपत्य असल्या कारणाने ते निवडणूक लढवण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसत नाही.
त्याचमुळे पाटील यांनी शहरभर बायको पाहिजेचे बॅनर लावले आहेत. रमेश पाटील यांना निवडणूक लढवायची इच्छा होती. मात्र लॉकडाऊनमध्ये तिसरे आपत्य झाल्यामुळे ते निवडणुकीसाठी उभे राहू शकत नाही. याच कारणाने चक्क निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार बायको पाहिजे असे लिहलेले बॅनर संपूर्ण शहरभर झळकत आहेत. मात्र हा पब्लिसिटी स्टंट असून केवळ प्रसिद्धीसाठी सदर व्यक्तीने हे कृत्य केल्याची प्रतिक्रिया शहरातील मान्यवरांकडून येत आहे.
बायको अशी हवी?
निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे. त्यासाठी कुठलीही जातीची अट नाही. कुठल्याही जातीची महिला चालेल. वय वर्ष २५ ते ४० वयोगटातील अविवाहित, विधवा, घटस्फोटीत महिला चालेल. मात्र यामध्ये त्यांनी एक अट ठेवली आहे. या महिलेला एक किंवा दोन अपत्य असावे. यापेक्षा जास्त असल्यास त्या महिलेला स्वीकारण्यात येणार नाही. असेही त्या बॅनरवर लिहिलेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-
“नाव सार्थकी लागले… मविआ-मद्य विक्री आघाडी”, सदाभाऊंचा खोचक टोला
-
“…तर तुम्हाला आमचे पाहुणे बनावे लागेल”, ट्रोलर्सच्या प्रश्नांना मुंबई पोलिसांचे उत्तर
-
‘मन की बात’ एकत्र ऐकता यावी यासाठी सर्व शक्ती केंद्रावर व्यवस्था करणार-चंद्रकांत पाटील
-
“२०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल”, भाजप नेते कपिल पाटील यांचे मोठे वक्तव्य
-
राऊत, परबांविरुद्ध न्यायालयाचा अपमान केल्याची याचिका दाखल करणार-चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
