Share

“२०२४ पर्यंत पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये येईल”, भाजप नेते कपिल पाटील यांचे मोठे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पाकव्याप्त काश्मीर भारतात फक्त नरेंद्र मोदीच आणू शकतात. त्यामुळे महागाईसारख्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारवर टीका करण्यात अर्थ नाही, असे वक्तव्य भाजपचे खासदार कपिल पाटील (BJP MP Kapil Patil) यांनी केले आहे.

दरम्यान कपिल पाटील शनिवारी कल्याणमध्ये व्याख्यानमालेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, ‘कदाचित २०२४ पर्यंत काही तरी होईल आणि पाकव्याप्त काश्मीर ( Pakistan-occupied Kashmir) भारतामध्ये येईल आणि या गोष्टी केवळ मोदी(Prime Minister Narendra Modi) करु शकतात त्यामुळे अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही’ असे म्हटले. मात्र यानंतर लगेच आपल्या वक्तव्याची सारवासारव करत त्यांनी “पंतप्रधान नरसिंहराव यांनी अशा प्रकारचा कायदा केला होता. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे. त्याचा पुन्हा भारतामध्ये समावेश होणे, ही देशातील प्रत्येक नागरिकाची अशी मनोमन इच्छा आहे. त्याच्यासाठी आपण सर्वजण आशेवर आहोत, असा माझ्या विधानाचा अर्थ आहे” असे म्हटले.

दरम्यान कपिल पाटील यांनी महागाईवरील विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे. कांदे, बटाटे, तूरडाळ, मुगडाळ या सगळ्यातून आपण बाहेर पडले पाहिजे. देशच नसेल तर कांदे बटाटे कुठून खरेदी करणार? महागाईचे समर्थन कोणीही करु शकत नाही. पण कांदा आणि बटाट्याचे भाव कमी करण्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान झालेले नाही असे कपिल पाटील यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!